आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड चॅम्पियन मनूचे अाेमप्रकाशसाेबत सुवर्ण; वर्ल्डकपमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवादालाजरा (मेक्सिकाे)- भारताच्या १६ वर्षीय युुवा खेळाडू मनू भाकरने अवघ्या काही तासांतच नेमबाजीच्या विश्वचषकात गाेल्डनचा डबल धमाका उडवला. तिने वैयक्तिकसह सांघिक गटातही सुवर्णपदकाची कमाई केली. तिने अापला सहकारी अाेमप्रकाश मिरथवानसाेबत १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र गटात साेनेरी यश संपादन केले. त्यांनी या गटाच्या फायनलमध्ये ४७६.१ गुणांसह अव्वल स्थान गाठले. यासह युवा नेमबाज मनूने अापल्या पदार्पणातील वर्ल्डकपमध्ये सलग दाेन सुवर्णपदके जिंकण्याची एेतिहासिक कामगिरी केली. तिने साेमवारी या गटाच्या एकेरीत सुवर्णपदक पटकावले हाेते. 


यामुळे अाता भारताच्या नावे तीन सुवर्णपदकांची नाेंद झाली अाहे. यात रिझवी शहजारच्या एका अाणि मनू भाकरच्या दाेन सुवर्णपदकांचा समावेश अाहे. तसेच सात पदकांसह भारतीय संघ पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानावर अाहेत. यात भारताची तीन सुवर्ण व चार कांस्यपदकांचा समावेश अाहे. 

मेहुली घाेषला दुसरे पदक
भारताच्या १७ वर्षीय मेहुली घाेषने पदकाचा डबल धमाका उडवला. तिने १० मीटर एअर रायफलच्या मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तिने अापला सहकारी दीपक कुमारसाेबत हे यश संपादन केले. या जाेडीची फायनलमधील कामगिरी चमकदार राहिली.  

 

 

शगुन, श्रेयसीची निराशा
भारताच्या अनुभवी महिला नेमबाजांना अापापल्या गटात समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्यामुळे त्यांची निराशा झाली. यात श्रेयसीसह शगुन चाैधरीचा समावेश अाहे. श्रेयसीने महिलांच्या ट्रॅप प्रकाराच्या पात्रता फेरीत १०६ गुणांसह २२ वे स्थान गाठले. तसेच शगुन चाैधरी यात २१ व्या स्थानावर राहिली. सीमा ताेमरने १५ व्या स्थानावर धडक मारली. मात्र, त्यांना अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला नाही.

 

बातम्या आणखी आहेत...