आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल ठरला वर्ल्ड चॅम्पियन; मनूचे तिसरे पदक हुकले! विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुअादालाजरा- भारताच्या युवांनी अायएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पदक जिंकण्याची अापली माेहीम अबाधित ठेवली. अखिल श्याेरणने रविवारी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. ताे पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पाेझिशन प्रकारामध्ये चॅम्पियन ठरला. यासह त्याने पदक तालिकेतील भारताचे अव्वल स्थान कायम  ठेवलेे. दुसरीकडे भारताला तिसरे पदक मिळवून देण्याचा १६ वर्षीय मनू भाकरचा प्रयत्न अपुरा ठरला. तिला २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने यापूर्वी, १० मीटर पिस्तुलाच्या एकेरी अाणि मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली हाेती. अाता तिने तिसऱ्या पदकासाठी झुंज दिली.

 

अाता भारतीय संघाच्या नावे एकूण ९ पदकांची नाेंद झाली. यामध्ये चार सुवर्णांसह एक राैप्य अाणि चार कांस्यपदकांचा समावेश अाहे. यासह भारताने पदकतालिकेमधील अापले अव्वल स्थान कायम ठेवले. 

 

अखिल चाैथा वर्ल्ड चॅम्पियन 
अापल्या गटात सरस कामगिरी करताना अखिलने सुवर्णपदकाची कमाई केली. यासह ताे यंदाच्या स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला भारताचा चाैथा नेमबाज ठरला. यापूर्वी शहजार रिझवी, मनू भाकर, मेहुली घाेष (सांघिक) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.

बातम्या आणखी आहेत...