Home | Sports | Other Sports | Wrestler Sushil Kumar Name Missed From CWG 2018 Entry List

CWG मध्ये गोल्ड मेडलच्या हॅट्ट्रिकची संधी असलेल्या सुशीलचे नाव एंट्री लिस्टमध्ये नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 30, 2018, 12:53 PM IST

सुशील कुमारने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ आणि 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलही मिळवले आहे.

 • Wrestler Sushil Kumar Name Missed From CWG 2018 Entry List
  सुशील कुमार 2 वेळा ऑलिम्पिक मेडल जिंकणारा पहिला भारतीय क्रीडापटू आहे.

  नवी दिल्ली - कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवण्याची हॅट्ट्रिक करण्याची संधी असलेल्या पहिलवान सुशील कुमारचे नाव गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ- 2018 च्या एंट्री लिस्टमध्ये नाही. ही स्पर्धा 4 एप्रिलपासून सुरू होत आहे. सुशीलने 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये 66 किलोग्राम फ्री स्टाइल कॅटेगरी आणि 2014 च्या ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 74 किलोग्राम फ्री स्टाइल कॅटेगरीत गोल्ड मिळवले होते. त्याशिवाय त्याने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक आणि 2012 च्या लंड ऑलिम्पकमध्ये सिलव्हर मेडलही जिंकले आहे.


  वेबसाइटवर प्रसिद्ध झाली यादी
  - एजन्सीच्या मते, कॉमनवेल्थ-2018 गेम्सच्या वेबसाईटवर 74 किलोग्रॅम रेसलिंग कॅटेगरी लिस्टमध्ये जारी करण्यात आली आहे. त्यात सुशील कुमारचे नाव नाही.
  - सुशील कुमार यांच्या कोचने यावर आक्षेप घेतला आहे. यादीत इतर भारतीय खेळाडुंची नावे आहेत पण सुशील कुमारचे नाव का नाही? त्याचे कारण काय?
  - मीडिया रिपोर्ट्सनुसार सुशील 20 मार्चपासून जॉर्जियामध्ये ट्रेनिंग घेत आहे.


  19 पैकी 14 खेळांत भारतीयांचा सहभाग
  - 21 वे कॉमनवेल्थ गेम्स ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधील गोल्ड कोस्टमध्ये 4 एप्रिलपासून सुरू होत आहेत.
  - 15 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या इव्हेंटसाठी 227 सदस्यीय भारतीय दलाची (123 पुरुष आणि 104 महिला खेळाडु) घोषणा झाली आहे.
  - यात अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 37 आणि हॉकीमध्ये 36 खेळाडू सहभागी होतील. भारतीय दलामध्ये सर्वाधिक 32 खेळाडू हरियाणाचे आहेत.
  - यावेळी कॉमनवेल्थ इव्हेंटमध्ये एकूण 19 गेम्स आहेत. त्यापैकी 14 मध्ये भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत.


  ट्रायलदरम्यान झाला होता वाद
  - कॉमनवेल्थ गेम्स 2018 साठी डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या ट्रायलदरम्यान रेसलर सुशील कुमार आणि प्रवीण राणा यांच्या सपोर्टर्समध्ये वाद आणि मारहाण झाल्याचे समोर आले होते.
  - सुशील कुमारने राणासह इतर दोन पहिलवानांना पराभूत करून कॉमनवेल्थ गेम्सच्या 74 किलोग्राम गटासाठी क्वालिफाय केले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये वाद झाले होते.

 • Wrestler Sushil Kumar Name Missed From CWG 2018 Entry List

Trending