Home | Sports | Other Sports | 1.43 lakh crores in the World Cup; This amounted to 99% of GDP

वर्ल्डकपमध्ये हाेणार 1.43 लाख काेटींचा खर्च; ही रक्कम 99 देशांच्या जीडीपीपेक्षा सर्वाधिक

दिव्य मराठी | Update - Jun 13, 2018, 05:34 AM IST

रशियातील फिफा वर्ल्डकप २०१८ च्या अधिकृत बजेटची अाकडेवारी १३,१४० काेटी अाहे. हे बजेट मुख्यत: स्टेडियमसाठी हाेते. मात्र, र

 • 1.43 lakh crores in the World Cup; This amounted to 99% of GDP

  ११२ देशांचा विकास दर अाहे यापेक्षा अधिक
  रशियातील फिफा वर्ल्डकप २०१८ च्या अधिकृत बजेटची अाकडेवारी १३,१४० काेटी अाहे. हे बजेट मुख्यत: स्टेडियमसाठी हाेते. मात्र, रशियाने वाहतूक, सुरक्षा अाणि अाराेग्य व्यवस्थेवर एकूण ८८ हजार काेटींचा खर्च करण्यात अाला. यामध्ये वर्ल्डकपसंबंधित पर्यटन अाणि जाहिरातीच्या खर्चाचा जाेड लावला तर हा अाकडा १ लाख ४३ हजार काेटी रुपये हाेऊ शकताे. ही रक्कम जगातील २११ पैकी ९९ देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक अाहे. रशियाला यजमानपदासाठी ही रक्कम खर्च करण्यात अाली. कारण रशियाकडे युराेपच्या तुलनेत फुटबाॅलचे तंत्र मजबूत नव्हते.

  > रशियामध्ये २.२२ लाख राेजगार निर्माण

  इकाॅनाॅमीला १० वर्षांत २.०९ लाख काेटींचा फायदा
  रशियाच्या इकाॅनॉमीला यजमानपदामुळे २.०९ लाख काेटींचा फायदा झाला. रशियाने अायाेजनासाठी क्रीडा अाणि इन्फ्रास्ट्रक्चरवर ८८ हजार काेटी रुपये खर्च झाले. याची ३० टक्के (२८ हजार काेटी) रक्कम खेळाशी संबंधित वस्तू, ५० टक्के (४६ हजार काेटी) ट्रान्सपाेर्ट-हेल्थ अाणि सिक्युरिटी, २० टक्के (१४ हजार काेटी) हाॅटेल व इतर सपाेर्ट अॅक्टिव्हिटीवर खर्च झाला. २०१३ ते २०२३ च्यादरम्यान इकाॅनॉमीला २.०९ काेटींचा फायदा हाेईल. या स्पर्धेच्या अायाेजनाच्या तयारीसाठी रशियामध्ये २.२२ लाख राेजगार निर्माण झाला. यातून युवांना काम मिळाले.

  १५ लाख पर्यटक दाखल, ४०० % पर्यटन वाढणार
  दरम्यान रशियात पर्यटनामध्ये तब्बल ४०० टक्क्यांनी वाढ हाेईल. यादरम्यान १५ लाख विदेशी पर्यटक यानिमित्ताने येतील अशी रशियाला अाशा अाहे. याशिवाय वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठीही लाखाे फुटबाॅल चाहतेही याठिकाणी दाखल हाेतील. हे यादरम्यान विविध शहरांना भेटी देतील. हे देश-विदेशातील फुटबाॅल चाहते जवळपास २० हजार काेटींचा खर्च करतील. वर्ल्डकपसाठीचे १.२० अतिरिक्त तिकिटे एका तासात विकली गेलीत. यादरम्यान ज्या देशाचे संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले नाहीत त्याही देशांतील चाहते याठिकाणी येतील असाही अायाेजकांना विश्वास अाहे.

  > चीनला मिळणार ५,६३० काेटींच्या जाहिराती

  सर्वाधिक चीनमध्ये, २५ हजार काेटींच्या जाहिराती
  वर्ल्डकपच्या दरम्यान विविध कंपन्या २५ हजार काेटी रुपये जाहिरातीवर खर्च करणार अाहेत. सर्वाधिक ५६३० काेटींच्या जाहिराती चीनमध्ये दाखवल्या जातील. त्यानंतर अमेरिकेमध्ये २७०० काेटींच्या जाहिराती हाेतील. चीन अाणि अमेरिकेच्या संघांना विश्वचषकाचे तिकीट मिळाले नाही. मात्र, तरीही या ठिकाणी फुटबाॅलला अफाट लाेकप्रियता अाहे. फुटबाॅलनंतर येथील नागरिक हे शाॅपिंगवर अधिक खर्च करतात. याच कारणामुळे या कंपन्यांचा अधिक जाेर या दाेन्ही देशांवर अाहे. यजमान रशियात वर्ल्डकपच्या जाहिरातीवर ४३२ काेटींचा खर्च हाेईल.

  बांगलादेशने ६७५ काेटींचे स्पाेर्ट्सविअर विकले
  वर्ल्डकपमध्ये सहभागी हाेत असलेल्या संघांच्या खेळाडूंचे किट बांगलादेशमध्ये तयार झाले. बांगलादेशने ६७५ काेटींचे स्पाेर्टसविअर अाणि फ्लॅग विकले अाहेत. यात खेळाडू, चाहते अाणि देशाच्या जर्सींचाही समावेश अाहे. याठिकाणी अादिदास, प्युमा, नाइकी, जी-स्टार, एचअॅण्डएम अाणि मार्क्स अॅण्ड स्पेंसर सारख्या अांतरराष्ट्रीय ब्रंॅडेड कपड्यांचा समावेश अाहे. बांगलादेशच्या अनेक कंपन्या वर्षभरात युराेपियन क्लबच्या खेळाडंूसाठी स्पाेर्टसविअर तयार करतात. पाकिस्तानने यंदाच्या वर्ल्डकपसाठी टेलस्टार-१८ हा अत्याधुनिक स्वरूपाचा चेंडू तयार केला.

  २४ लाख तिकिटांची झाली विक्री

  - 15 लाख तिकिटे विदेशी चाहत्यांनी खरेदी केली. रशियन नागरिकांनी खरेदी केली ८.७२ लाख तिकिटे.


  - 88 हजार तिकिटे अमेरिकन चाहत्यांकडे. हे सर्वाधिक. मात्र, अमेरिकेचा संघ स्पर्धेसाठी पात्र नाही.


  - 72 हजार तिकिटे ब्राझीलच्या चाहत्यांनी खरेदी केली. ही संख्या वर्ल्डकप खेळणाऱ्या देशाकडून रशियानंतर सर्वाधिक ठरते.


  - 28 हजार तिकिटे भारतीय चाहत्यांकडेे. वर्ल्डकप न खेळणाऱ्या देशात तिसरे स्थान.अमेरिका, चीननंतर भारतीय.


  - 850 तिकिटे असाेसियन्स टीमला. ज्यांना पात्रता पूर्ण करता अाली नाही. या देशांची संख्या १७७ अाहे.

  पुढील स्लाईडवर क्लिक करून पहा २० वर्षांत साडेसहा पट वाढला वर्ल्डकप अायाेजनाचा खर्च

 • 1.43 lakh crores in the World Cup; This amounted to 99% of GDP

Trending