आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्योंगचेंग- नयनरम्य विद्युत राेषणाई, हजाराे कलाकारांचा कलाविष्कार अाणि चाहत्यांच्या जल्लाेेषाने फुलून निघालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने शुक्रवारी दक्षिण काेरियात २३ व्या हिवाळी अाॅलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेच्या दीप प्रज्वलनाचा साेहळा रंगला. या वेळी माेठ्या संख्येत कलाकारांनी अापली कला सादर केली. येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत रंगणाऱ्या या अाॅलिम्पिक स्पर्धेत ९२ देशांचे संघ सहभागी झाले. २ हजार ९५२ खेळाडू स्पर्धेत १५ खेळांच्या प्रकारात काैशल्य पणास लावतील.
अमेरिकेचे सर्वात माेठे पथक : यंदाच्या स्पर्धेत अमेरिकेचे सर्वात माेठे पथक सहभागी झाले अाहे. अमेरिकेचे २४२ खेळाडू या स्पर्धेत अापले काैशल्य पणास लावतील.
उद््घाटनीय साेहळ्यादरम्यान दक्षिण काेरियाचे राष्ट्रपती मून जाई इन यांनी उत्तर काेरियाचा हुकूमशहा किम जाेंगची बहीण किम याे जाेंगचे स्वागत केले. याप्रसंगी अायअाेसीचे अध्यक्ष थाॅमस बाक उपस्थित हाेते.
भारत संचलनात ६१ व्या स्थानावर
भारताचा २ सदस्यीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला अाहे. यात अनुभवी अाॅलिम्पियन शिवा केशवनसह जगदीशचा समावेश अाहे.
काेरियन अल्फाबेटने ध्वज संचलन; ग्रीसनंतर घानाच्या टीमला संधी
उद््घाटन साेहळ्यादरम्यान झालेले ध्वज संचलन हे काेरियातील अल्फाबेटच्या अाधारे झाले. त्यामुळे सुरुवातीला ग्रीसचा संघ अाघाडीवर हाेता. त्यानंतर घानाच्या टीमला संधी मिळाली. सर्वात शेवटी युनायटेड काेरिया (उत्तर व दक्षिण) संघ हाेता.
पुढील स्लाइडवर पाहा फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.