आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 27 Cr Plays Football In The World, The 350th Most Popular Competition For 350 Cr Fans!

जगात 27 काेटी लाेक फुटबाॅल खेळतात, याची सर्वात माेठी स्पर्धा 350 काेटी चाहते पाहणार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेला केवळ ६ दिवस शिल्लक आहेत. जवळपास ३२ दिवस रंगणाऱ्या या मेगा इव्हेंटवर जगभरातील चाहत्यांची नजर अाहे. याचे कारणही खास अाहे. २११ देशांतील एकूण २७ काेटी लाेक फुटबाॅल खेळतात. याचाच अर्थ असा की जगातील चार टक्के लाेकसंख्या ही फुटबाॅलची फॅन अाहे. त्यामुळे पृथ्वीतलावरील प्रत्येक २५ लाेकांमागे एक जण फुटबाॅलपटू अाहे. युराेप व अमेरिकेत याचे प्रमाण सहास एक असे अाहे.

 

फुटबाॅल लाेकप्रिय; कारण १४५ वर्षांत नियमात बदल नाही 

जगातील २११ देश फिफाचे सदस्य, संयुक्त राष्ट्रापेक्षा १८ अधिक, ५० कोटींवर सदस्य

फुटबाॅलला जागतिक स्तरावर नियंत्रित करण्याचे कार्य फिफाच्या वतीने केले जाते. ही जगातील सर्वात माेठी संस्था अाहे. यामध्ये २११ देश सदस्य अाहेत. त्यामुळे याची संख्या ही संयुक्त राष्ट्र संघातील सदस्यांपेक्षाही (१९३) अधिक अाहे. फिफाच्या माहितीनुसार जवळपास ५० काेटी लाेक, खेळाडू, अधिकारी, क्लब मालक, क्लब मेंबर  या खेळाशी जाेडलेले अाहेत.

 

- ५०० पेक्षा अधिक लीग : जगभरात ५०० पेक्षा अधिक क्लब लेव्हल लीग फिफाशी संलग्न अाहेत. इतर खेळांच्या तुलनेत सर्वाधिक.
- अायअाेसीला टक्कर : टाेकियाे अाॅलिम्पिकच्या ३३ खेळांना ३.८ अब्ज चाहते पाहतील. तसेच २०१८ फिफा वर्ल्डकपला ३.५ अब्ज चाहता वर्ग लाभेल. 
- अाॅलिम्पिकमध्येही फिफाचीच मर्जी : अाॅलिम्पिकमध्ये सर्वाेत्कृष्ट संघ सहभागी हाेतात. मात्र, फुटबाॅलबाबत असे नाही. वर्ल्डकपची लाेकप्रियता ढासळू नये म्हणून या अाॅलिम्पिकसाठी २३ वर्षांखालील संघ पाठवला जाताे. एका टीममध्ये चार खेळाडू वयस्कर असतात.

 

काेट्यवधींची कमाई वर्ल्डकपच्या वेळी 
फिफाच्या २०१७ च्या रेव्हेन्यूची अाकडेवारी ७३४ मिलियन डाॅलर हाेती. २०१८ मध्ये २ हजार मिलियन डाॅलरची अाशा अाहे. वर्ल्डकपच्या वर्षात कमाईमध्ये तिपटीने वाढ हाेते. २०१४ मध्ये रेव्हेन्यू २०९६ मिलियन डाॅलर हाेता. २०१५ मध्ये ५४४ मिलियन डाॅलर हाेता.

 

- सर्वात साेपा नियम  
हात न लावता चेंडूला प्रतिस्पर्धी संघाच्या गाेलपाेस्टमध्ये टाकण्याचा फुटबाॅलमधील सर्वात माेठा नियम. याच नियमामुळे फुटबॉल सर्वाधिक लाेकप्रिय.

 

- नियमात बदल नाही
१८६३ मध्येे माॅडर्न फुटबाॅलचे नियम तयार झाले. तेव्हापासून अाजपर्यंतच्या १४५ वर्षांत यात काेणतेही बदल झालेले नाहीत.  

 

- स्वस्त अाणि सहज
हा खेळ खेळण्यासाठी एकाच चेंडूची गरज अाहे. अधिक साहित्याची गरज नाही. बूट न घालता भारताने अाॅलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली हाेती. 

 

अाॅफ सीझन नाही
अधिकांश खेळात अाॅफ सीझन असताे. मात्र, फुटबाॅल हा अपवाद अाहे. जानेवारी ते डिसेंबरपर्यंत महिन्याकाठी सामने असतात. 

 

- शरिरयष्टीला महत्त्व नाही
फुटबाॅल हा निवडक खेळ प्रकार अाहे, ज्यात शरीरयष्टीला फारसे महत्त्व नाही. काेणतीही व्यक्ती हा खेळ सहज खेळू शकताे.

 

6 - ९० मिनिटांचा खेळ
मेंदू ९० ते १२० मिनिटांपर्यंतच फाेकस करू शकताे. त्यानंतर विश्रांती पाहिजे. यालाच अल्ट्राडियन ऱ्हिदम असे म्हणतात. फुटबाॅल याच फ्रेमचा गेम अाहे.

 

7 - सर्वाधिक चाहते 

२७ काेटी लाेक जर खेळू शकतात, तर त्याच्या चाहत्यांची संख्या तीन अब्ज अाहे. ही इतर काेणत्याही खेळापेक्षा अधिक.  

 

 

पुढील स्लाईडवर पहा, फिफाचे सर्वाधिक सदस्य ५६ देश आफ्रिकन फुटबॉल असोशिएशनचे 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...