आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 763 Out Of 4 Percent Of The Players Will Goal 2 Or More; More Than 3 Goal 1%

763 मधून 4 टक्के खेळाडूंचे 2 वा अधिक गाेल; 3 पेक्षा अधिक गाेल करणारे 1 टक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सच्या जस्ट फाेंटेनने १९५८ च्या विश्वचषकातील सहा सामन्यांत सर्वाधिक १३ गाेल केलेे. एका स्पर्धेत सर्वाधिक गाेल करण्याचा हा ६० वर्षांपूर्वीचा विक्रम अाजही कायम अाहे. अातापर्यंत तीनच खेळाडूंनी एका स्पर्धेत सर्वाधिक १० गाेेल केले. - Divya Marathi
फ्रान्सच्या जस्ट फाेंटेनने १९५८ च्या विश्वचषकातील सहा सामन्यांत सर्वाधिक १३ गाेल केलेे. एका स्पर्धेत सर्वाधिक गाेल करण्याचा हा ६० वर्षांपूर्वीचा विक्रम अाजही कायम अाहे. अातापर्यंत तीनच खेळाडूंनी एका स्पर्धेत सर्वाधिक १० गाेेल केले.

खेळाडूंची सर्वाेत्तम ड्रिबलिंग, अचूक प्रकारची पासिंग अाणि गाेलरक्षकाचे सर्वाेत्कृष्ट संरक्षण, यामुळेच फुटबाॅलच्या सामन्याला चांगली रंगत येते. यातील एक पैलू म्हणजे या खेळाची उंची वाढवून देताे- ताे म्हणजे गाेेल. यावरच  सामन्याची अाणि खेळाडूची गुणवत्ता टिकून अाहे. कारण जितके अधिक गाेल तितका त्या सामन्यातील राेमांच अधिक असताे. मात्र, रंगत अाणणारे गाेल करण्याची संधीही सामन्यादरम्यान फार कमी मिळतात.  २०१४ च्या विश्वचषकावर नजर टाकल्यास लक्षात येते की,  ७३६ पैकी केवळ १२१ खेळाडूंना प्रत्येक एक गाेल करता अाला. दाेन वा त्यापेक्षा अधिक गाेल करणाऱ्यांची संख्या त्यापेक्षाही कमी अाहे.

 

> अाठ खेळाडू अाहेत गाेल्डन बुटाचे प्रबळ दावेदार; सात खेळाडू अद्यापही अपयशी

नेमार (ब्राझील, २६ वर्षे)
गत स्पर्धेत टीमचा उपांत्य फेरीत पराभव झाला. त्याच्या नेतृत्वात टीमने पहिल्यांदा अाॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. अांतरराष्ट्रीय गाेल: 54, क्लब: 141

 

मेसी (अर्जेंटिना, ३० वर्षे)
नेतृत्वात टीमने २०१४ वर्ल्डकपची फायनल गाठली हाेती. त्याचे या सत्रात सर्वाधिक ४५ गाेल अाहेत. अांतरराष्ट्रीय गोल:64, क्लब: 394

 

रोनाल्डो (पाेर्तुगाल, ३३ वर्षे)

करिअरमध्ये आतापर्यंत २६ ट्राॅफी जिंकल्या. मात्र, त्याच्या टीमला अद्याप वर्ल्डकप जिंकता आला नाही.आंतरराष्ट्रीय गोल:81, क्लब: 398 

 

ग्रीजमॅन (फ्रान्स, २७ वर्ष)

युराे कपमधील गाेल्डन बूट विजेत्या ग्रीजमॅनचे २०१६ च्या युराे कपमध्ये ६ गाेल. यंदा ताे ला लीगाचा सर्वाेत्कृष्ट खेळाडू.  आंतरराष्ट्रीय गोल: 20, क्लब: 125

 

सालाह, (इजिप्त, २५ वर्षे)
इजिप्त २८ वर्षांनंतर वर्ल्डकपसाठी पात्र. अाता सालाहवर टीमच्या विजयाची मदार. लिव्हरपूलसाेबत ३३४ काेटींचा करार.  आंतरराष्ट्रीय गोल: 33, क्लब : 89 

 

सुअारेझ (उरुग्वे, ३१ वर्षे)
मेसीनंतर बार्सिलाेनातील सुपरस्टार म्हणून सुअारेझची अाेळख. कवानीसाेबत त्याची जाेडी प्रतिस्पर्ध्यासाठी धाेकादायक. आंतरराष्ट्रीय गोल : 51, क्लब : 280

 

म्युलर (जर्मनी, २८ वर्ष)
२०१४ मध्ये पाच गाेलसह दुसऱ्या स्थानावर राहिला हाेता. अाता अाक्रमणाची जबाबदारी असेल. आंतरराष्ट्रीय गोल: 40, क्लब: 120

 

कैन (इंग्लंड, २४ वर्षे) 

टाेटेनहॅमकडून खेळणाऱ्या एडवर्ड कैनकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा. सर्वाेत्कृष्ट स्ट्रायकरपैकी एक मानला जाताे. आंतरराष्ट्रीय गोल : 13, क्लब: 122

बातम्या आणखी आहेत...