Home | Sports | Other Sports | Crazy Football Fan Banned From Entering Stadium Hires Huge Crane To Watch Favourite Team

क्रेझी फॅनला स्टेडिअमने केले बॅन, अशी शक्कल लढवून पाहिली मॅच

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 02, 2018, 12:04 AM IST

भारतात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानले जाते. तर युरोपियन आणि इतर देशांमध्ये हीच क्रेझ फुटबॉलसाठी दिसून येते.

 • Crazy Football Fan Banned From Entering Stadium Hires Huge Crane To Watch Favourite Team

  स्पोर्ट्स डेस्क - भारतात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानले जाते. तर युरोपियन आणि इतर देशांमध्ये हीच क्रेझ फुटबॉलसाठी दिसून येते. अशाच एका क्रेझी फुटबॉल फॅनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फुटबॉल चाहत्याला एका मैदानाने बॅन केले. कुठल्याही परिस्थितीत मैदानात एंट्री देण्यास नकार दिला. मैदानाने त्याला आत येण्यापासून रोखले. पण, मॅच पाहण्यापासून रोखू शकले नाही. त्याने चक्क मैदानाच्या बाहेर एक भली-मोठी क्रेन लावली. त्याच उंच अशा क्रेनवर बसून त्याने लाइव्ह फुटबॉल मॅच पाहिली.


  - तुर्कीतील या क्रेझी फुटबॉल फॅनचे नाव डेमिरकाया असे आहे. लोक मीडियाच्या वृत्तानुसार, तुर्की डेनिझली फुटबॉल क्लबचा सामना अतातुर्क स्टेडिअमवर रंगला होता. पण, या मैदान प्रशासनाने डेमिरकियावर 12 महिन्यांची बंदी लावली.
  - तुर्की डेनिझली हा डेमिरकियाचा सर्वात आवडता फुटबॉल संघ आहे. तो कुठल्याही परिस्थितीत हा सामना चुकवण्याच्या मूडमध्ये नव्हता. आपण, मैदानात प्रवेश करणार नाही तसेच बंदी मोडणार नाही असे त्याने पोलिस स्टेशनमध्ये शपथपत्र लिहून दिले.
  - यानंतर अली डेमिरकियाने एक मोठी क्रेन भाड्यावर घेतली. त्याने ही क्रेन भाड्यावर घेण्यासाठी 5 हजार रुपये खर्च केले. त्याच क्रेनला मैदानाच्या बाहेर लावून त्यावर बसून त्याने आपल्या आवडत्या संघाला खेळताना पाहिले. तसेच चिअर सुद्धा केले.
  - त्याने हा सामना पाहताना बंदीची अट मोडली नाही, तसेच मैदानात न येताच मॅच पाहिली. या क्रेझी फुटबॉल फॅनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, अली डेमिरकियाचा व्हिडिओ...

 • Crazy Football Fan Banned From Entering Stadium Hires Huge Crane To Watch Favourite Team

Trending