Home | Sports | Other Sports | Muslim Goalkeeper Fakes Injury Twice So His Team Members Gets Time To Break The Fast

फुटबॉलपटूंना रोजा इफ्तारसाठी वेळ मिळावा म्हणून गोलकीपरने केले असे नाटक...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 05, 2018, 04:00 PM IST

टुनीशिया फुटबॉल संघाची मॅच सुरू असताना त्यांचा गोलकीपार मोइस हसन अचानक मैदानावर कोसळला.

  • Muslim Goalkeeper Fakes Injury Twice So His Team Members Gets Time To Break The Fast

    स्पोर्ट्स डेस्क - टुनीशिया फुटबॉल संघाची मॅच सुरू असताना त्यांचा गोलकीपार मोइस हसन अचानक मैदानावर कोसळला. त्याने आपण जखमी झाल्याचे सांगितल्याने मॅच थांबवावी लागली आणि ब्रेक घ्यावा लागला. याच ब्रेक दरम्यान त्याच्या सहकारी मुस्लिम फुटबॉलपटूंनी आपली रोजा इफ्तारी केली. हसनने अशाच प्रकारे जखमी झाल्याचे सांगत गेल्या आठवड्यात सुद्धा मॅच थांबवली होती. त्यानंतर त्याने हा प्रकार केवळ आपल्या टीमच्या सदस्यांना इफ्तार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून केल्याची कबुली दिली. टुनीशिया फुटबॉल संघातील 23 सदस्यांपैकी 22 सदस्य हे मुस्लिम आहेत. त्यापैकी बहुतांश खेळाडू हे रोजा ठेवून मैदानावर खेळण्यासाठी उतरतात. पण, खेळ ऐन रोजा सोडण्याच्या वेळी सुरू असताना इफ्तारची वेळ ते पाळू शकत नाहीत. त्यामुळे, मोइस हसनने ही शक्कल लढवली होती.

    पुढील स्लाइडवर पाहा, व्हिडिओ...

Trending