आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेनाचे 13 महिन्यांनंतरचे दमदार पुनरागमन अपयशी;मुलगी अाॅलिम्पियाने पाहिला सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 न्यूयाॅर्क- माजी नंबर वन टेनिसस्टार सेरेना विल्यम्सचा वर्षभरानंतर दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. तब्बल १३ महिन्यानंतर ती काेर्टवर उतरली. मात्र, याठिकाणी तिला  पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यादरम्यान तिची सहा महिन्यांची मुलगी अाॅलिम्पियाही उपस्थित हाेती. तिनेही अापले वडील अॅलेक्ससाेबत या सामन्याचा अानंद लुटला. मात्र, हाच अानंद विजयाने सेरेनाला द्विगुणित करता अाला नाही. दरम्यान माजी नंबर वन व्हीनसने एकेरीच्या १ हजाराव्या सामन्यात विजयश्री खेचून अाणली. नाॅर्थ कॅराेलीनाच्या एश्विलेमध्ये फेड चषकातील सामन्याचे अायाेजन करण्यात अाले. यादरम्यान अमेरिका अाणि हाॅलंड यांच्यात सामना रंगला.  सेरेनाने अापला शेवटचा सामना गत वर्षी जानेवारीत खेळला हाेता.   


दुहेरीत सेरेनाचा पराभव

हाॅलंडविरुद्ध सामन्यात सेरेनाला समाधानकारक खेळी करता अाली नाही. तिला महिला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिने या सामन्यात व्हीनससाेबत काैशल्यपणास लावले. मात्र, हाॅलंडच्या डेमी शुअर्स अाणि लेस्ली केर्कहाेवने सरस खेळी करताना या दाेन्ही अमेरिकन खेळाडूंवर ६-२, ६-३ ने एकतर्फी विजय संपादन केला.   


माजी नंबर वन व्हीनसने जिंकला १ हजारावा सामना
माजी नंबर वन व्हीनसने १ हजाराव्या सामन्यात विजय संपादन करत तिने महिला एकेरीच्या या लढतीमध्ये अरांत्सा  रसवर मात केली. तिने ६-१, ६-४ ने सामना जिंकला. यासह तिने एक हजार सामन्यात ७७६ व्या विजयाची नाेंद केली. यासह तिला अापली लय कायम ठेवता अाली. 

 

अाॅलिम्पियाची उपस्थिती लक्षवेधी 
सेरेनाला गत वर्षी सप्टेंबरमध्ये कन्यारत्न झाले. अाता फेड चषकादरम्यान ती सहा महिन्यांच्या अाॅलिम्पियासह स्पर्धेच्या ठिकाणी अाली. या वेळी चिमुकल्या अाॅलिम्पियाची उपस्थिती सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. तिनेही याठिकाणी अाईच्या सामन्याचा अानंद लुटला.

बातम्या आणखी आहेत...