आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाशिया चषक: पाकला नमवून भारतीय महिला संघ फायनलमध्ये; अाज बांगलादेशविरुद्ध लढत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर - हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाला अाता सातव्या अाशिया चषकावर नाव काेरण्याची संधी अाहे. भारताने शनिवारी  प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारतीय महिलांनी ७ गड्यांनी सामना जिंकला.  


कर्णधार हरमनप्रीत काैर (नाबाद ३४) अाणि स्मृती मानधनाने (३८) सरस खेळी करताना अवघ्या १६.१ षटकांत विजयश्री खेचून अाणली.   यासह भारताने महिलांच्या अाशिया चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सहा वेळच्या चॅम्पियन भारतीय संघाचा अंतिम सामना अाता बांगलादेशशी हाेणार अाहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ७ बाद ७२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने ३ गड्यांच्या माेबदल्यात २३ चेंडू राखून विजयाचे अावाक्यातले लक्ष्य सहज गाठले.   


एकताचे तीन बळी : भारताकडून एकता बिष्टने धारदार गाेलंदाजी केली. तिने ४ षटकांत १४ धावा देत ३ गडी बाद केले.  शिखा, अनुजा, पूनम अाणि दीप्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यामुळे पाकचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. यासह भारताने अंतिम फेरीचा पल्ला गाठला.

बातम्या आणखी आहेत...