आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअालाेर साताेर- रिअाे अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेत्या सिंधूने एशियन टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील अापली विजयी माेहीम अबाधित ठेवली. तिने गुरुवारी या स्पर्धेत गटातील दुसरा सामना जिंकला. मात्र, इतर खेळाडूंच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतरही भारतीय महिलांना या स्पर्धेच्या अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. भारतीय महिला संघ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात जपानविरुद्ध पराभूत झाला. जपानने ४-१ अशा फरकाने सामना जिंकला. युवांच्या अपयशामुळे भारतीय महिला टीमचा सलग दुसऱ्या विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. भारतीय पुरुष संघानेही अंतिम अाठचा प्रवेश निश्चित केला. या टीमला इंडाेनेशियाने पराभूत केले.
महिला दुहेरीच्या लढतीत भारताच्या सानयाेगिता अाणि प्राजक्ता सावंतला पराभवाला सामाेरे जावे लागले. या जाेडीला जपानच्या शिन्हाे तनाका अाणि काेहारू याेनेमाेताने पराभूत केले. जपानच्या जाेडीने २१-१७, २१-१७ ने विजय संपादन केला. यासह त्यांनी जपानच्या अाघाडीला मजबूत केले.
एकेरीत अश्विनीचा पराभव
महिला दुहेरीची अव्वल खेळाडू अश्विनी पाेनप्पाला एकेरीच्या लढतीत अापले अाव्हान कायम ठेवता अाले नाही. तिचा एकेरीच्या सामन्यात पराभव झाला. जपानच्या अाेहारीने अवघ्या २६ मिनिटांमध्ये अश्विनीला सरळ दाने गेममध्ये धूळ चारली. तिने २१-१४, २१-१२ अशा फरकाने एकेरीचा सामना जिंकला. या तिने अापल्या टीमला २-१ ने अाघाडी मिळवून दिली. अश्विनीला दाेन्ही गेममध्ये समाधानकारक खेळी करता अाली नाही.
सिंधूने उघडले विजयाचे खाते
जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या सिंधूने दमदार खेळीच्या बळावर भारतीय महिला टीमला विजयाचे खाते उघडून दिले. तिने महिला एकेरीचा सामना अवघ्या ३६ मिनिटांत जिंकला. तिने लढतीत जपानच्या अकाने यामागुचीवर सरळ दाेन गेममध्ये मात केली. तिने २१-१९, २१-१२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद करता अाली. यरासह भारताने १-० ने अाघाडी घेतली हाेती.
३६ मिनिटांत केली पराभवाची परतफेड
सिंधूने अवघ्या ३६ मिनिटांमध्ये जपानच्या अकाने यामागुचीला वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमधील पराभवाची परतफेड केली. गत वर्षी दुबई येथील स्पर्धेत जपानच्या खेळाडूने सिंधूला पराभूत केले हाेते. यासह सिंधूने यामागुचीविरुद्ध विजयाची ५-३ ने नाेंद केली अाहे. तिचा या खेळाडूवरचा हा पाचवा विजय ठरला. तीन वेळा यामागुची विजयी झाली.
श्रीकृष्ण प्रियाकडून निराशा
गत सामन्यात निर्णायक विजय मिळवणाऱ्या ऋत्विकाला विश्रांती देत श्रीकृष्ण प्रियाला एकेरीसाठी संधी देण्यात अाली. मात्र, तिने यात निराशा केली. तिला जपानच्या अाघाडीच्या सयाका साताेच्या अाव्हानाला परतावून लावता अाले नाही. साताेने २६ मिनिटांमध्ये प्रियावर मात केली. तिने २१-१२, २१-१२ ने सामना जिंकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.