आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Australian Open Tennis Tournament: Wageniakki, Nadal In The Quarter finals

अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धा: वाेज्नियाकी, नदाल उपांत्यपूर्व फेरीत; दिमित्राेवची अागेकूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील कॅराेलिना वाेज्नियाकी, नंबर वन राफेल नदालने रविवारी सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दुसरीकडे भारताच्या लिएंडर पेसने मिश्र दुहेरीचा सामना जिंकला. मात्र, त्याला पुरुष दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या मानांकित ग्रिगाेर दिमित्राेव अाणि सहाव्या मानांकित मरीन सिलीचनेही अापली लय कायम ठेवताना अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला.   


तिसऱ्या मानांकित दिमित्राेवने अंतिम १६ च्या सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने लढतीत १७ व्या मानांकित निक किर्गियाेसचा पराभव केला. त्याने ७-६, ७-६, ४-६, ७-६ अशा फरकाने सामना जिंकला. यामुळे त्याला उपांत्यपूर्व फेरी गाठता अाली. यासाठी त्याने चार सेटवर शर्थीची झंुज दिली. किर्गियाेसने पुनरागमन करताना तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारली. मात्र, त्याचा दिमित्राेवला राेखण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. 

   
दुसरीकडे मरिन सिलीचने एकेरीच्या लढतीत दहाव्या मानांकित बुस्ताचा पराभव केला. त्याने ६-७, ६-३, ७-६, ७-६ अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. यासह त्याला स्पर्धेतील अापले अाव्हान कायम ठेवता अाले. बुस्ताने दमदार सुरुवात करताना पहिला सेट जिंकून अाघाडी घेतली हाेती. मात्र, त्याला ही लय कायम ठेवता अाली नाही. तिसऱ्या मानांकित दिमित्राेवने शानदार पुनरागमन करताना दुसरा सेट जिंकला अाणि लढतीत बराेबरी साधली. त्यापाठाेपाठ त्याने दाेन्ही सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.   


नदालचे अव्वल स्थान मजबूत
जगातील नंबर वन राफेल नदालने पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये अर्जेंटिनाच्या दिएगाे श्वार्टजमॅनवर मात केली. त्याने सरस खेळी करताना  ६-३, ६-७, ७६-३, ६-३ ने विजयश्री खेचून अाणली. या विजयाच्या बळावर नदालला अापले नंबर वनचे सिंहासन अाता अधिक मजबूत करता अाले. त्याने करिअरमध्ये दहाव्यांदा अाॅस्ट्रेलियन अाेपनच्या अंतिम अाठमध्ये प्रवेश केला.


वाेज्नियाकीचा शानदार विजय 
डेन्मार्कच्या कॅराेलिना वाेज्नियाकीने महिला एकेरीतील अापली विजयी माेहीम कायम ठेवली. तिने लढतीमध्ये स्लाेव्हाकियाच्या मागदालेना रायबारीकाेवाचा पराभव केला. तिने ६-३, ६-० अशा फरकाने सामना सरळ दाेन सेटमध्ये जिंकला. यामुळे तिला अंतिम अाठचा प्रवेश निश्चित करता अाला.   


पेस-पुरवचा पराभव
भारताच्या लिएंडर पेस अाणि पुरव राजाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. या जाेडीला पुुरुष दुहेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ११ व्या मानांकित काबाल-फराहने लढतीत पेस-पुरवचा ६-१, ६-१ ने पराभव केला.   


पेस-बाबाेस मिश्र दुहेरीत विजयी 
अनुभवी टेनिस स्टार पेसला मिश्र दुहेरीत विजय संपादन करता अाला. त्याने बाबाेससाेबत हे यश संपादन केले. त्यामुळे या जाेडीला अागेकूच करता अाली. त्यांनी पेरेझ-व्हिट्टीनगटाेनवर ६-२, ६-४ ने विजय मिळवला.