आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिया अाेपनमध्ये सिंधूला हरवणाऱ्या बिवेनचा संघर्षमय प्रवास;सट्टा लावलेले सामने जिंकून अार्थिक अडचणी दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अार्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने पाच वर्षे अालेल्या सर्वच संकटांचा सामना करताना अमेरिकन बॅडमिंटपटू बिवेन झांगने साेनेरी यशाचा पल्ला गाठला. यातून तिने रविवारी भारतात झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत किताब जिंकण्याचे एेतिहासिक यश संपादन केले. यासाठी तिचा प्रवास हा संघर्षमय ठरला. 


तिने फायनलमध्ये रिअाे अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेत्या सिंधूचा पराभव करून इंडिया अाेपनमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तिचा चार वर्षांनंतरचा हा पहिला किताब ठरला. तिने फायनलमध्ये अत्यंत सरस खेळी करताना बलाढ्य सिंधूला धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला. तिचा हा विजय महत्त्वाचा ठरला.  


काेचशिवाय जिंकला किताब

अार्थिक परिस्थिती दुबळी असल्याने बिवेनला अनेक गाेष्टींचा सामना करावा लागला. पैसेच नसल्याने तिला प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेता अाले नाही. मात्र, तिने जिद्द साेडली नाही. तिने कसून  या स्पर्धेची तयारी केली. यातूनच तिला काेचशिवाय इंडिया अाेपनचा किताब जिंकता अाला.    


वयाच्या पाचव्या वर्षी काेर्टवर

चीनमध्ये जन्मलेल्या बिवेनला वयाच्या पाचव्या वर्षीच बॅडमिंटनचा छंद जडला. यातूनच तिने अल्पावधीत बॅडमिंटनमधील बारकावे अात्मसात केले. दरम्यान, तिने कमी वयातच काेर्टवर अापला दबदबा निर्माण केला. या वेळी १३ व्या वर्षी तिचे कुटुंबीय सिंगापूरमध्ये वास्तव्यास अाले. यादरम्यान तिने सिंगापूरकडून खेळताना २००९ दक्षिण एशियन गेम्समध्ये कांस्यपदकाची कमाई केली. 

 

काेचसाेबत वाद; हाॅटेलमध्ये केले काम  
एशियन गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर बिवेनला अापला दबदबा निर्माण करता अाला. मात्र, याचदरम्यान तिचा मुख्य प्रशिक्षकासाेबत वाद झाला. त्यामुळे तिला अकादमीमधून बाहेर पडावे लागले. तिला २०१२ मध्ये अनेक संकटांना सामाेरे जावे लागले. याला सामाेरे जाताना तिने हाॅटेलमध्ये काम केले. यावर मात करून तिने पुनरागमन करताना हे यश मिळवले.

बातम्या आणखी आहेत...