आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Boxer Floyd Mayweather Who Brings Money Trucks To His Home, American Professional Boxing Promoter And Former Professional Boxer

या खेळाडूच्या घरी ट्रकांनी भर-भरून येतो पैसा, झोपतोही नोटांवरच...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - अल्टीमेट फायटिंगचा बिनविरोध बादशहा (अनडिसप्यूटेड किंग) म्हणून ओळखल्या जाणारा  फ्लॉएड मेवेदर सोशल मीडियावर आपल्या कॅशमुळेही प्रसिद्ध आहे. तो एकाचवेळी बँकांमधून अब्जावधी रुपये बाहेर काढतो. इतकी रोख रक्कम की त्याच्या घरी रोकड पाठवण्यासाठी चक्क ट्रक पाठवल्या जातात. 4 हजार कोटींहून अधिकचा मालक असलेल्या फ्यॉएड मेवेदरचा खर्च आणि बँक बॅलेन्स पाहिल्यास सर्वांना धक्का बसेल. कॅश, कॅश आणि कॅश करणारा बॉक्सर मेवेदर झोपतानाही आपल्या जवळपास नोटा ठेवून झोपतो.

 

- मेवेदर जेवण करत असो की विमानात प्रवास, तो अगदी झोपताना सुद्धा आपल्या जवळपास नोटाच-नोटा ठेवण्याचा शौकीन आहे. 
- कित्येक वेळा स्ट्रिपर्स क्लबमध्ये तो एकाचवेळा लाखो डॉलर हवेत उडवून येतो. नोटांविषयी असलेला त्याचा वेडेपणा पाहून लोक त्याला सायको देखील म्हणतात. 
- आपल्या प्रोफेशनल बॉक्सिंग करिअरमध्ये त्याने आतापर्यंत 50 मॅच खेळले. त्यापैकी एकही मॅच त्याने हारलेला नाही. 
- ऑगस्ट 2017 मध्ये मेवेदरने सर्वात महागड्या फाइटमध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट्सचा सुपरस्टार कोनोर मॅकग्रेगोरला पराभूत करून 50 वा विजय मिळवला. 
- या फाइटमध्ये त्याने 650 कोटी रुपये जिंकले होते. तसेच फ्लाएड मेवेदरवर या फाइटमध्ये 3832 कोटींचा सट्टा लावण्यात आला होता. 
- मेवेदरने मॅनी पॅक्वियाओला 2015 मध्ये पराभूत केले होते. त्यामध्ये मेवेदरला तब्बल 1300 कोटी रुपये मिळाले होते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फक्त पैसा-पैसा करणाऱ्या बॉक्सरचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...