Home | Sports | Other Sports | Commonwealth Games Day 8 In Gold Coast News And Updates

कॉमनवेल्थ:सुशील कुमारची 'सुवर्ण' हॅट्ट्रिक, बबीता फोगाटसह तेजस्विनी सावंतला सिल्व्हर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2018, 06:42 PM IST

कॉमनवेल्थ गेम्सच्या आठव्या दिवशी कोल्हापूरची शूटर तेजस्विनी सावंतने भारताला सिलव्हर पदक मिळवून दिले आहे.

 • Commonwealth Games Day 8 In Gold Coast News And Updates

  गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रेसलिंग इव्हेंटमध्ये आतापर्यंत भारताला 4 मेडल मिळाले आहेत. यात रेसलर सुशील कुमारने अवघ्या 10 सेकंदांत देशाला गोल्ड मिळवून दिला आहे. तर बीडचा राहुल आवारे याने 57 किलो वजनी गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. सोबतच बबीता फोगाटने सिलव्हर जिंकले आहे. भारताला कुस्तीमध्ये चौथा मेडल किरणने जिंकून दिला. तिला ब्राँझ मिळाले आहे. याच दिवशी कोल्हापूरची तेजस्विनी हिने रायफल शूटिंगमध्ये सिलव्हर मेडल जिंकले. 50 मीटर रेंज रायफलमध्ये तिने हा मान मिळवला. भारताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत 29 मेडल जिंकले आहेत. त्यामध्ये 14 गोल्ड, 6 सिलव्हर आणि 9 ब्राँझचा समावेश आहे. पदक तालिकेत आता भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

  सुशील कुमारची हॅट्रिक

  - सुशील कुमारने फायनलमध्ये आपल्या प्रतिस्पर्धी रेसलर अवघ्या 10 सेकंदात चित केले. सेमीफायनल आणि तत्पूर्वीच्या तिन्ही सामन्यात त्याने मेडन कामगिरी केली.

  - यासोबतच सुशील कुमारने आपल्या पहिल्या कॅनडेनियन प्रतिस्पर्धीला 11-0 ने, दुसरा पाकिस्तानी विरोधक बटला 10-0 ने आणि तिसरा प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन रेसलरच्या फाऊलनंतर फायनलमध्ये मजल मारली.

  - कॉमनवेल्थमध्ये सुशील कुमारचे हे तिसरे गोल्ड आहे. यापूर्वी 2010 आणि 2014 मध्ये सुद्धा त्याने सुवर्ण कामगिरी केली.

  बीडचा राहुल आवारे गोल्ड मेडलिस्ट

  - बीडच्या पाटोदा येथे राहणाऱ्या राहुल आवारेने आपल्या गावासह साऱ्या देशाचे नावलौकिक केले आहे. 57 किलो वजनी गटात त्याने गोल्ड पटकावले. त्याचा सामना पाहण्यासाठी गावात थेट प्रक्षेपणाच्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. तसेच राहुलसाठी प्रार्थना, होम हवन सुद्धा करण्यात आले होते. राहुलच्या सुवर्ण कामगिरीने गावात उत्सवाचे वातावरण आहे.

 • Commonwealth Games Day 8 In Gold Coast News And Updates
 • Commonwealth Games Day 8 In Gold Coast News And Updates
 • Commonwealth Games Day 8 In Gold Coast News And Updates

Trending