आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेमेलु लुकाकुने उडवला गोलचा डबल धमाका; बेल्जियमचा 3-0 ने विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेच्ची - जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर बेल्जियम संघाने साेमवारी फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत धडाकेबाज विजय संपादन केला. बेल्जियमने जी गटातील अापल्या पहिल्या सामन्यात पनामाचा पराभव केला. सुपरस्टार फाॅरवर्ड राेमेलु लुकाकुच्या (६९, ७५ वा मि.) गाेलच्या बळावर बेल्जियमने ३-० अशा फरकाने सामना जिंकला. संघाच्या विजयात मार्टेन्सनेही (४७ वा मि.) एका गाेलचे याेगदान दिले. त्यामुळे बेल्जियमला एकतर्फी विजयाची नाेंद करता अाली. या विजयाच्या अाधारे बेल्जियम संघाने गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले अाहे. 


प्रत्युत्तरात जागतिक क्रमवारीत ५५ व्या स्थानावर असलेल्या पनामाला शेवटपर्यंत गाेल करता  अाला नाही. बलाढ्य बेल्जियमसमाेर या टीमचा निभाव लागला नाही. अाता पनामाचा स्पर्धेतील दुसरा सामना इंग्लंडशी हाेणार अाहे.  इंग्लंडविरुद्ध विजयासाठी पनामाला माेठी कसरत करावी लागेल. 

 

लुकाकुची सुरेख खेळी 
फाॅरवर्ड राेमलु लुकाकुने सामन्यात दुसऱ्या हाफनंतर सुरेख खेळी केली. त्याने अवघ्या सहा मिनिटांच्या फरकाने सलग दाेन गाेल करून टीमचा एकतर्फी विजय निश्चित केला. त्याने ६९ अाणि ७५ व्या मिनिटाला गाेल केले.

 

बेल्जियमला दुसऱ्या विजयाची संधी 
फाॅर्मात असलेल्या बेल्जियमला अाता स्पर्धेत सलग दुसऱ्या माेठ्या विजयाची संधी अाहे. या टीमचा स्पर्धेतील दुसरा सामना २३ जुन राेजी ट्युनिशियाशी हाेणार अाहे. यात बाजी मारून बेल्जियमचा संघ गटात अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिल.

बातम्या आणखी आहेत...