आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅल इंग्लंड चॅम्पियनशिप: पी.व्ही. सिंधू प्रथमच सेमीत;उपांत्य फेरी गाठणारी दुसरी भारतीय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम- पी.व्ही. सिंधू अाता प्रतिष्ठेच्या अाॅल इंग्लंडचा किताब जिंकण्यापासून अवघ्या दाेन पावलांवर अाहे. तिने शुक्रवारी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. तिने अापल्या करिअरमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेच्या अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. तसेच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी सिंधू ही भारताची दुसरी महिला खेळाडू ठरली.  तिने चॅम्पियनशिपच्या ११८ वर्षांच्या इतिहासामध्ये हे यश संपादन केले अाहे. चाैथ्या मानांकित सिंधूने एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत वर्ल्ड चॅम्पियन नाेजाेमी अाेकुहाराला धूळ चारली. तिने १ तास २४ िमनिटांच्या रंगतदार लढतीमध्ये २०-२२, २१-१८, २१-१८ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह तिने अापले अाव्हान कायम ठेवताना पुढची फेरी गाठली. पराभवामुळे वर्ल्ड चॅम्पियन अाेकुहाराला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. 


अाेकुहारावर पाचवा विजय

भारताच्या सिंधूने अापल्या करिअरमध्ये अाेकुहारावर पाचव्या विजयाची नाेंद केली. अातापर्यंत या दाेघींमध्ये १० सामने झाले. यातील पाच सामन्यात सिंधूने विजयश्री खेचून अाणली. तिने अाता विजयाच्या रेकाॅर्डमध्येही बराेबरी साधली. अाता दाेघींच्याही नावे एकमेंकीविरुद्ध प्रत्येकी पाच विजयाची नाेंद झाली अाहे.  

बातम्या आणखी आहेत...