Home | Sports | Other Sports | FIFA World Cup in 64 matches; 56 friendly matches in 16 days

64 सामन्यांचा फिफा विश्वचषक; 16 दिवसांत 56 मैत्रीपूर्ण सामने

वृत्तसंस्था | Update - May 30, 2018, 02:41 AM IST

नुकत्याच झालेल्या यूएफ चॅम्पियन्स लीगच्या फायनलनंतर अाता युराेपीय फुटबाॅल क्लबचे सत्रही समाप्त झाले. कारण यामध्ये जगभरात

 • FIFA World Cup in 64 matches; 56 friendly matches in 16 days

  माॅस्काे - नुकत्याच झालेल्या यूएफ चॅम्पियन्स लीगच्या फायनलनंतर अाता युराेपीय फुटबाॅल क्लबचे सत्रही समाप्त झाले. कारण यामध्ये जगभरातील खेळाडू माेठ्या संख्येत सहभागी हाेतात. त्यानंतर अाता सर्व खेळाडूंची नजर फिफाच्या वर्ल्डकपकडे लागली अाहे. कारण येत्या १४ जूनपासून रशियामध्ये फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात हाेणार अाहे.


  तब्बल १६ दिवस रंगणाऱ्या वर्ल्डकपमध्ये एकूण ६४ सामने हाेतील. याच्या तयारीसाठी ५६ मैत्रीपूर्ण सामन्यांचे अायाेजन करण्यात अाले. यातूनच ३२ संघ यंदाच्या वर्ल्डकपची कसून तयारी करतील. चार वर्षांनंतर हाेणारा हा विश्वचषक अाता रशियात अायाेजित करण्यात अाला. त्यामुळे चाहत्यांमध्ये यातील निकालाबाबत प्रचंड उत्सुकता लागली अाहे. कारण सध्या सर्वच संघांतील खेळाडूंनी सत्रामधील क्लब फुटबाॅलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली अाहे.

  यातूनच या सर्वांकडून अाता राष्ट्रीयसाठी अव्वल कामगिरीची अाशा अाहे. येत्या १५ जुलैपर्यंंत रंगणाऱ्या या विश्वचषकात युवा खेळाडूंना अापल्यातील प्रतिभा दाखवण्याची संधी अाहे. ब्राझीलच्या संघाने सहाव्यांदा किताब जिंकण्याचा दावा केला अाहे. त्यासाठी नेमारही सज्ज झाला अाहे.

  याेग्य समन्वय, डावपेचांचा नसताे खुलासा
  या मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान दाेन्ही संघांतील खेळाडूंमध्ये याेग्य प्रकारचा समन्वय साधला जावा, यावर अधिक भर दिला जाताे. कारण संघातील खेळाडू हे सातत्याने वर्षभरात वेगवेगळ्या क्लबकडून खेळत असतात. त्यामुळे एकाच संघातील खेळाडूंना साेबत खेळताना सुरुवातीला त्रास हाेताे. मात्र, त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण सामन्याने चांगला समन्वय साधला जाताे. मात्र, ते कधीही डावपेचांचा खुलास करताना दिसत नाहीत.

  इटलीकडून साैदी अरबचा पराभव
  सेंट गालेनच्या केबुन पार्क स्टेडियमवर अायाेजित सराव सामन्यात इटलीने बाजी मारली. इटलीने वर्ल्डकपच्या तयारीसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये साैदी अरबचा पराभव केला. इटलीच्या संघाने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. अांद्रिया बेलाेटी व बाेलेटेलीने प्रत्येकी एक गाेल करून इटलीला विजय मिळवून दिला.

  पुढील स्लाईडवर पहा, महिन्यात क्रिकेटचे २६ अांतरराष्ट्रीय सामने

 • FIFA World Cup in 64 matches; 56 friendly matches in 16 days

Trending