आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA WORLD CUP : जाेसचा 89 व्या मिनिटाला गाेल; उरुग्वेचा 1-0 ने राेमहर्षक विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एेकातरिबर्ग - दाेन वेळच्या विश्वविजेत्या उरुग्वे संघाने शुक्रवारी राेमहर्षक विजयाने २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. उरुग्वे संघाने एच गटातील अापल्या पहिल्या सामन्यात इजिप्तचा पराभव केला. सुअारेझच्या उरुग्वेने रंगतदार सामना १-० अशा फरकाने जिंकला. जाेस गिमेनेजने ८९ व्या मिनिटाला थरारक गाेल करून उरुग्वेचा विजय निश्चित केला. सुपरस्टार फाॅरवर्ड माे. सालाहच्या अनुपस्थित मैदानावर उतरलेल्या इजिप्तला पराभवाचा सामना करावा लागला.

 

या टीमच्या तगड्या डिफेन्सला भेदून जाेसने हेडरने सुरेख गाेल केला. यासह त्याने अापल्या टीमला स्पर्धेत विजयाचे खाते उघडून दिले. दरम्यान, इजिप्तच्या टीमचा विजयासाठीचा प्रयत्न अपुरा ठरला.  यातूनच इजिप्तवर पराभवाची नामुष्की अाेढवली. मात्र, या टीमच्या गाेलरक्षक शेनवाईने सुरेख कामगिरी केली. त्यामुळे  संघाचा माेठ्या फरकाने पराभव टळला. त्याने दाेन वेळा गाेलपाेस्टवर झालेला हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. 

 

गाेल न करता इराण विजयी; अजीजने केला अात्मघातकी गाेल   
इराणच्या संघाने गाेल न करताही फिफाच्या विश्वचषकात विजयी सलामी दिली. इराण संघाने ब गटातील पहिल्या सामन्यात माेरोक्काेचा पराभव केला. इराणने १-० ने सामना जिंकला.माेरोक्काेच्या अजीज बाेहरुद्दाेउझने (९० वा मि.) अात्मघातकी गाेल केला अाणि या गाेलच्या बळावर इराणने एकतर्फी विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर इराण संघाने गटात अव्वल स्थानावर धडक मारली. अाता या टीमला १९ जून राेजी यजमान रशियाच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. 

 

ग्रुप अाॅफ डेथमध्ये विजयासाठी झुंज; क्राेएशिया-नायजेरिया सामना   
ग्रुप अाॅफ डेथ मानल्या जाणाऱ्या ड गटातील दाेन संघाची झुंज शनिवारी रंगणार अाहेे. या वेळी गटातील क्राेएशिया अाणि नायजेरिया संघ समाेरासमाेर असतील. त्यामुळे या गटात विजयाचे खाते उघडण्यासाठी दाेन्ही संघ उत्सुक अाहेत. त्यामुळे या सामन्यावर सर्वांची नजर असेल. काेच राेहर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी सलामी देण्यासाठी नायजेरिया संघ उत्सुक अाहे.

 

सांचेझच्या फ्री किकवर जाेसचा हेडर 
तगड्या डिफेन्समुळे हा सामना शेवटच्या मिनिटापर्यंत शून्य गाेलने बराेबरीत हाेता. दाेन्ही संघ गाेलसाठी प्रयत्नशील हाेते. मात्र, यात उरुग्वेचे खेळाडू यशस्वी ठरले. अनुभवी खेळाडू सांचेझने ८९ व्या मिनिटाला फ्री किक मारली. त्यामुळे उसळलेल्या चेंडूला जाेसने हेडरच्या अाधार गाेलपाेस्टमध्ये पाठवले. 

 

मेसीचा विजयी सलामीचा दावा

जगातील सुपरस्टार लियाेनेल मेसी अाता विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत अर्जेंटिनाला विजयी सलामी देण्यासाठी सज्ज झाला अाहे. अाता वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी अर्जेंटिना संघ मैदानावर उतणार अाहे. ड गटात अर्जेंटिना अाणि अाइसलंॅड यांच्यात सामना रंगणार अाहे. या सामन्यात अर्जेंटिना टीमच्या विजयाचा दावा मजबूत मानला जाताे. या गटातील बलाढ्य संघ मानला जाताे. दाेन वेळच्या विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाला यंदा किताबाचे प्रबळ दावेदार मानले जाते. त्यामुळे अापल्या जेतेपदाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी कंबर कसली. या टीमने १९७८ अाणि १९८६ मध्ये किताबाचा बहुमान पटकावला हाेता. अाता पात्रता फेरीत इक्वाडाेरचा पराभव करून अर्जेंटिनाने २०१८ च्या विश्वचषकातील अापला प्रवेश निश्चित केला. यादरम्यान १८ सामन्यात अर्जेंटिनाने १९ गाेल केले.  यूएफए युराे चॅम्पियनशिपमधील उपविजेता फ्रान्स संघ चांगली सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी फ्रान्सला विजयी सलामीची संधी अाहे. फ्रान्सचा पहिला सामना अाॅस्ट्रेलियाशी हाेणार अाहे. अाॅस्ट्रेलियाने प्ले अाॅफमधील सरस खेळीतून वर्ल्डकपचे तिकीट मिळवले.

बातम्या आणखी आहेत...