Home | Sports | Other Sports | fifa world cup Serbia won the free kicks of Kolarova

FIFA WC - काेलाराेवच्या फ्री किकने सर्बिया विजयी; मेक्सिकाेचा गतविजेत्या जर्मनीला धक्का

वृत्तसंस्था | Update - Jun 18, 2018, 05:30 AM IST

जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असलेल्या सर्बिया संघाने रविवारी फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत शानदार विजय

 • fifa world cup Serbia won the free kicks of Kolarova
  फ्री किक मारताना सर्बियाचा काेलाराेव. अपयशी ठरलेला गाेलरक्षक नावास.

  समारा - जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असलेल्या सर्बिया संघाने रविवारी फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत शानदार विजयाचे खाते उघडले. या संघाने इ गटातील अापल्या पहिल्या सामन्यात समाराच्या मैदानावर काेस्टारिकाचा पराभव केला. सर्बियाने रंगतदार सामन्यात १-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. कर्णधार काेलाराेवने ५६ व्या मिनिटांला फ्री किकवर गाेल करून सर्बियाच्या संघाला शानदार राेमहर्षक विजय मिळवून दिला.
  या विजयाच्या बळावर सर्बियाच्या टीमने गटाच्या गुणतालिकेत ३ गुणांसह अव्वल स्थानावर धडक मारली. अाता या टीमचा दुसरा सामना स्वित्झर्लंडशी हाेईल. दरम्यान विजयासाठीचा काेस्टारिकाच्या खेळाडूंचा प्रयत्न अपुरा ठरला. या टीमने सामन्यात बराेबरीसाठी जाेरदार प्रयत्न केला. मात्र, सर्बियाच्या मजबुत डिफेंन्सने काेस्टारिकाचा प्रयत्न हाणुन पाडला.

  ब्रानिस्लावचे सर्वाधिक सामने; १०४ सामना खेळला
  सर्बियाच्या प्राेफेशनल फुटबाॅलपटू ब्रानिस्लाव इवानाेविचने रविवारी अापल्या करिअरमधील १०४ वा सामना खेळला. यासह त्याच्या नावे सर्वाधिक सामने खेळण्याच्या कामगिरीची नाेंद झाली. त्याने विश्वचषकातील इ गटात काेस्टारिकाविरुद्ध हा सामना खेळला.

  विश्वचषकात दाेन युवा करणार अाज भारताचे प्रतिनिधित्व

  रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अखेर भारताचे प्रतिनिधित्व सोमवारी बेल्जियम विरुद्ध पनामा यांच्यात होणाऱ्या जी गटातील सामन्यात दिसेल. भारताचे दोन मुले कर्नाटकचा १० वर्षीय रिषी तेज आणि तामिळनाडूची ११ वर्षीय नथानिया जॉन विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व करतील. हे दोघे विश्वचषकात दोन सामन्यात अधिकृत बॉल करिअरच्या रूपात मैदानावर पाहायला मिळतील. बेल्जियमचा सामना १८ जून व ब्राझीलचा सामना २२ जून रोजी खेळवला जाईल. सुनील छेत्रीने या मुलांची निवड केली आहे.

  आशियाच्या दुसरा विजयासाठी कोरिया अाज मैदानावर!

  सौदी अरबला विश्वचषकात सलामीला यजमान रशियाकडून मिळालेला ५-० ने पराभव, इराणला मोरक्कोविरुद्ध आत्मघाती गोलमुळे मिळालेल्या विजयानंतर आशियाची तिसरी टीम कोरिया स्वीडन विरुद्ध सोमवारी गट एफच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. कोरियाला आपल्या एकमेव जागतिक दर्जांचा खेळाडू सोनकडून सर्वाधिक अाशा आहे. कोरिया आपला नववा विश्वचषक खेळत आहे. दुसरीकडे स्वीडन २००६ नंतर पहिल्या विश्वचषकात खेळेल. त्यांना गेल्या तीन सराव सामन्यात गोल करता आला नाही.

  नंबर वन जर्मनीचा सलामीला पराभव; लाेझानाेच्या गाेलने मेक्सिकाेची मात

  मेक्सिकाे संघाने रविवारी विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात जगातील नंबर वन जर्मनीचा पराभव केला. मेक्सिकाेने सलामीला १-० अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. हायरविंग लाेझानाेच्या (३४ वा मि.) राेमांचक गाेलच्या बळावर मेक्सिकाेने हा सामना जिंकला. यासह गत चॅम्पियन जर्मनीला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. या टीमने शेवटपर्यंत बराेबरीसाठी झंुज दिली. मात्र, मेक्सिकाेच्या सुरेख डिफेन्समुळे जर्मनीचा हा प्रयत्न अपुरा ठरला. यातून जर्मनीचा पराभव झाला.
  या विजयाच्या बळावर मेक्सिकाे संघाने एफ गटात अव्वलस्थानी धडक मारली. अाता जर्मनीचा दुसरा सामना शनिवारी स्वीडनशी हाेईल.

 • fifa world cup Serbia won the free kicks of Kolarova

Trending