आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- हिवाळी अाॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता मार्क मॅक्माेरिस हा गत ११ महिन्यांपूर्वी अायसीयूमध्ये दाखल हाेता. यादरम्यान त्याची जबडा अाणि हाताची हाडेही माेडली. डाेक्यालाही गंभीर दुखापत झाली. उजवे फुप्फुसही खराब झाले हाेते. त्यामुळे ही गंभीर प्रकृती पाहून डाॅक्टरांनीही अाता मार्क हे स्नाेबाेर्डिंग करू शकणार नसल्याची प्रतिक्रिया दिली हाेती. मात्र, त्याने अापली जिद्द साेडली नाही. प्रचंड मेहनतीच्या बळावर अापली इच्छाशक्ती कायम ठेवताना त्याने सलग दुसऱ्या िहवाळी अाॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. यात त्याने स्नाेबाेर्डिंगच्या स्लाेपस्टाइल प्रकारात पदक जिंकले. त्याचा साेच्ची (२०१४) व प्याेंगचेंगचा (२०१८) प्रवास हा अधिकच खडतर ठरला. फेब्रुवारी २०१६ मध्ये लाॅस एंजलिसमध्ये बिग एअर इव्हेंटदरम्यान त्याचे हाड माेडले. पुन्हा फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याचा अपघात झाला. ‘मार्क हा सरावासाठी घराबाहेर पडला. धुके असल्याने त्याला समाेरील झाड दिसले नाही. त्यामुळे ताे त्या झाडाला जाऊन धडकला. त्याला अायसीयूत दाखल केले,’असे त्याचा भाऊ क्रेगने सांगितले.
२ वर्षांपर्यंत खेळापासून दूर, स्किइंगमध्ये पदकाची दावेदार
इंग्लंडची राेवान शाेशिर २०१४ साेच्ची हिवाळी अाॅलिम्पिकच्या इव्हेंटची तयारी करत हाेती. एका दिवसानंतर तिचा फ्रीस्टाइल स्किइंगचा इव्हेंट हाेता. मात्र, याची तयारी तिच्या जिवावर बेतली. सरावादरम्यान पडल्यामुळे तिच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. मात्र, शरीरावरची ही दुखापत सहा महिन्यांत बरी झाली. मानसिकतेवर पडलेल्या परिणामातून सावरण्यासाठी तिला दाेन वर्षे लागलीत. यामुळे तिला नीट बाेलताही येत नव्हते. अाता यातून सावरत नव्याने अापल्या खेळाकडे वळली. अाता पदकाची मदार तिच्यावर अाहे. यात पदक जिंकणारी ती इंग्लंडची पहिली खेळाडू ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.