Home | Sports | Other Sports | Glamorous Manika Batra Proved Most Successful Indian Table Tennis Player At Commonwealth

भारताची नवी स्पोर्ट्स सेंसेशन, जिने खेळासाठी ठोकरले मॉडेलिंगचे करिअर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2018, 12:04 AM IST

गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्सचा रविवारी समारोप झाला. यात दिल्लीची 22 वर्षीय मणिका बत्रा भारताकडून सर्वात यशस्वी अॅथलीट ठरल

 • Glamorous Manika Batra Proved Most Successful Indian Table Tennis Player At Commonwealth

  स्पोर्ट्स डेस्क - गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्सचा रविवारी समारोप झाला. यात दिल्लीची 22 वर्षीय मणिका बत्रा भारताकडून सर्वात यशस्वी अॅथलीट ठरली आहे. तिने 4 पदके मिळवली आहेत. सोबतच, या गेमच्या इतिहासात 4 मेडल जिंकणारी ती पहिली महिला प्लेअर ठरली आहे. तिने हे मेडल्स सिंगल्स, वुमेन टीम, वुमेन डबल्स आणि मिक्स्ड डबल्समध्ये जिंकले आहेत.

  टेबल टेनिससाठी मॉडेलिंग नकारली...
  - ग्लॅमरस मणिका बत्रा हिला तिच्या लुक्समुळे शाळा आणि महाविद्यालय सुरू असतानाच मॉडेलिंगच्या ऑफर सुरू झाल्या होत्या. काही काळ तिने मॉडेलिंग सुद्धा केली. पण, तिने टेबल टेनिसमध्ये आपले करिअर करण्यासाठी मॉडेलिंग सोडली.
  - दिल्लीतील नारायण विहार येथे राहणारी मणिकाचा जन्म 15 जून 1995 रोजी झाला. तिने वयाच्या चौथ्या वर्षीच टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. बहिण आंचल आणि भाऊ साहिल यांच्यात ती सर्वात लहान आहे.
  - खेळावर फोकस करण्यासाठी तिने अनेक शाळा आणि कॉलेज बदलल्या. ती सध्या दिल्ली विद्यापीठातून कॉरेस्पॉन्डेंस बीएची डिग्री करत आहे.

  मणिकाचे अचीव्हमेंट
  - मणिकाने 2011 मध्ये चिली ओपनमध्ये अंडर-21 गटात सिल्व्हर मेडल मिळवले. 2014 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्सच्या क्वार्टरफायनल पर्यंत पोहोचली. कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये तिने 3 मेडल जिंकले.
  - 2016 मध्ये झालेल्या साउथ एशियन गेम्समध्ये तिने देशाला 3 गोल्ड मेडल मिळवून दिले. वुमन डबल्स, मिक्सड डबल्स आणि टीममध्ये तिने हे गोल्डमध्ये मिळवले.
  - मणिकाने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा क्वालिफाय केले. पण, पहिल्या राउंडमध्येच पराभव चाखावा लागला.
  - वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या क्वार्टरफायनल पर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. ती सध्या भारतात नंबर एक आहे.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्लॅमरस टेनिस स्टारचे आणखी काही फोटो...

Trending