आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सानिया मिर्झाने दिली \'गोड बातमी\', इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले #BabyMirzaMalik

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय टेनिस स्‍टार सानिया मिर्झाला डोहाळे लागले आहेत. तिच्या घरी एक नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिली. सानियाने यापूर्वीच म्हटले होते की तिला आणि पती शोएब मलिक दोघांनाही मुलगी हवी आहे. एवढेच नव्हे, तर तिचे अडनाव मिर्झा राहील असे शोएबने ठरवले आहे. तिने ती पोस्ट शेअर केली तेव्हा पाकिस्तानात प्रचंड टीकेला सामोरे जावे लागते. तरीही सानिया आणि शोएब वेळोवेळी आपल्या मनातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात. 

 

अशी शेअर केली गुड न्यूज

सानिया मिर्झाने आपण गर्भवती असल्याची बातमी वेगळ्याच शैलीत शेअर केली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. त्यामध्ये तीन टी-शर्ट आहेत. एक टीशर्ट होणाऱ्या बाळाची आहे. त्याखाली मिर्झा मलिक असे लिहिले आहे. सोबत फोटोमध्ये एक दुधाची बाटली सुद्धा आहे तिने या फोटोला #BabyMirzaMalik असे हॅशटॅग दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...