Home | Sports | Other Sports | For the first time, World Cup matches on 'Telstar-18'

प्रथमच ‘टेलस्टार-18’ वर वर्ल्डकप सामने; 1970 च्या थीमवर पाकमध्ये चेंडूची निर्मिती

दिव्य मराठी | Update - Jun 06, 2018, 04:36 AM IST

येत्या १४ जूनपासून रशियात फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेला किक बसणार अाहे. यासाठी अवघे ८ दिवस शिल्लक अाहेत. य

 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'

  माॅस्काे - येत्या १४ जूनपासून रशियात फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेला किक बसणार अाहे. यासाठी अवघे ८ दिवस शिल्लक अाहेत. या अाठवडाभरात ३२ देशांतील संघ हे किताबासाठी सज्ज अाहेत. रशियात हाेणारा यंंदाचा हा वर्ल्डकप अातापर्यंतच्या २० सत्रांपेक्षा वेगळा अाहे. यामध्ये पहिल्यांदाच व्हीएअारचा (व्हिडिअाे असिस्टंट रेफरी) वापर करण्यात येईल.पहिल्यांदा चिप लावलेल्या ‘टेलस्टार-१८’ या चेंडूवर वर्ल्डकपचे सामने रंगणार अाहेत. ‘टेलस्टार-१८’ चे खास डिझाइन पाकिस्तानमध्ये करण्यात अाले. ‘दिव्य मराठी’मध्ये अशी विविध माहिती देणे सुरू अाहे.

  मदर अाॅफ अाॅल बाॅल : फुटबाॅल

  काेणत्याही दाेन ते तीन वर्षांच्या मुलाला तुम्ही विविध अाकाराचे चेंडू एकाच वेळेस दिले तर तो फुटबाॅलच्या अाकाराच्या चेंडूंची सहजपणे निवड करेल, असे अापल्या लक्षात येईल. कारण या अाकाराच्या चेंडूला पायाने किक मारणे सहज साेपे असते. त्यामुळे ताे याची निवड करेल. अाजतागायत अालेल्या विविध बाॅल स्पाेर्ट््सला (चेंडूसाेबत खेळवले जाणारे खेळ) वापरले गेले. यातील अनेक चेंडूंचा इतिहास हा ८ ते ९ वर्षे जुना असल्याचे दिसते. तसेच फुटबाॅलच्या चेंडूला सर्वात माेठा एेतिहासिक वारसा लाभला अाहे.

  कारण मानवजातीच्या निर्मितीनंतरच या चेंडूचा उदय झाल्याचा इतिहास अाहे. त्यामुळे तब्बल ३ हजार वर्षांपूर्वी फुटबाॅलसारखा खेळ प्रचलित असल्याचे दिसते. म्हणजेच चेंडूशी मिळतेजुळते अाणि पायाने किक मारण्यासारखे काहीतरी मनाेरंजक खेळ खेळले जात असल्यामुळेच मदर अाॅफ अाॅल बाॅल असे म्हटले जाते.

  - जवळपास ३००० वर्षांपूर्वी युद्ध जिंकल्यानंतर पराभूतांच्या डाेक्याला किकने मारण्याचा खेळ प्रचलित हाेता. म्हणजेच मानवानेच किक मारण्याची प्रथा सुरू केली.
  - इतिहासातील संदर्भानुसार चेंडूचा वापर मानवाने प्राण्याच्या डाेके, ब्लॅडर अाणि कपड्यांच्या अाधारे केला.
  - चीनच्या हान साम्राज्यात (२,२५० वर्षे) प्राण्याच्या चामड्यांपासून तयार चेंडूचा वापर करण्यात अाला. यातूनच जागतिक स्तरावर फुटबाॅलच्या खेळाला मिळाली चालना. त्यानंतर याचाच वापर पुढे सातत्याने करण्यात अाला.
  - मध्ययुगीन काळात प्राण्याच्या ब्लॅडरला चामड्याचे अावरण लावले जायचे. त्यातून चेंडू तयार झाला. रबराचाही वापर हाेऊ लागला. त्यामुळे याच्या स्वरुपात बदल हाेत गेला.

  -१८३६ : चार्ल्स गुडइयरने पहिल्यांदा प्राण्याच्या ब्लॅडरच्या जागी रबराचा वापर करून चेंडू तयार केला. त्यांनी याचे पेटंटही केले.

  - १८६२ : एचजे लिंडनने रबराला फुलवण्याचा ब्लॅडर तयार केला. यादरम्यान त्यांना पत्नीचे माेठे सहकार्य लाभले. मात्र, त्यांना फुंक मारून अाजाराला सामाेरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी रबरापासून चेंडू तयार केला.
  - १८३६ : दरम्यान स्थापन झालेल्या इंग्लंड फुटबाॅल असाेसिएशनने फुटबाॅलसाठी नवीन नियम तयार केले. मात्र, चेंडूच्या अाकाराचा काेणताही नियम नव्हता.
  - १८७२ मध्ये नवीन नियम तयार झाले. चेंडूचे स्वरूपही निश्चित झाले. त्याचा अाकारही निश्चित झाला. त्याचे सरकमफेरेन्स २७ ते २८ इंच (६८.६ सेमी ते ७१.१ सेमी) असे. हाच नियम अाजही कायम.

  पाकची कंपनी करते चेंडूची निर्मिती

  टेलस्टार-१८ चे उत्पादन पाकच्या सियालकाेट येथील कंपनी फाॅरवर्ड स्पाेर्ट््सने केले. ही कंपनी चेंडू तयार करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध अाहे. ही कंपनी महिन्याकाठी ७ लाख चेंडूंची निर्मिती करते. ही कंपनी १९९४ पासून अदिदासपासून साेबत काम करत अाहे. २०१४ अाणि २०१८ साठीही याच कंपनीने चेंडू तयार केला.

  चेंडूला स्मार्ट फाेन हाेणार कनेक्ट

  टेलस्टार-१८ चेंडूला एनएफसी चिप लावली अाहे. हा चेंडू सर्व सामान्य नागरिक अाणि खेळाडूंना खरेदी करता येईल. या चिपच्या अाधारे खेळाडू हे या चेंडूला अापल्या स्मार्टफाेनलाही कनेक्ट करू शकतील व खेळाशी संबधित अनेक महत्त्वाची आकडेवारी, माहिती मिळवता येईल.

  पुढील स्लाइडवर वाचा, वर्ल्डकपमध्ये या चेंडूवर किक

 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'
 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'
  1930 स्पर्धेसाठी काेणत्याही प्रकारचा अाॅफिशियल असा चेंडू नव्हता. अंतिम सामना पहिला हाफ हा अर्जेंटिनाच्या चेंडू टिएंटाे अाणि दुसरा हाफ उरुग्वेच्या चेंडू टी-माॅडलने रंगला हाेता. १९३४ मध्ये चेंडूला ‘फेडरडेल’ नाव हाेते.
 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'
  1938 मध्ये एलन चेंडू. प्रथमच एका कंपनीने वर्ल्डकपच्या चेंडूंची ब्रँडिंग केली. दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामुळे १९४२ अाणि १९४६ मध्ये फुटबाॅल वर्ल्डकप झाला नाही.
 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'
  1950 मध्ये डुप्लाे चेंडूवर सामने झाले. प्रथमच पंपने फुगणारे चेंडू वापरले गेले. १९५४ मध्ये स्विस चॅम्पियन अाणि १९५८ मध्ये टाॅप स्टार चेंडू अाला.
 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'
  1962 क्रॅक टाॅप स्टार चेंडू अाला. विविध अाकाराच्या पॅनमुळे हा चेंडू युराेपियन टीमच्या पसंतीस पडला नाही. १९६६ मध्ये चॅलेंज ४- स्टार चेंडू अाला.
 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'
  1970 मध्ये टेलस्टार चेंडू अाला. ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवर हा चेंडू स्पष्ट दिसावा म्हणून हा रंग वापरला गेला. १९७४ मध्ये डरलास्ट, १९७८, १९८२ मध्ये टॅगाे चेंडू अाला.
 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'
  1986 एजटेका नावाचा चेंडू. पहिल्या सिंथेटिक चेंडूवर वर्ल्डकप झाला. १९९० युनिकाे, १९९४ मध्ये क्वेस्त्रा, १९९८ मध्ये ट्राय, २००२ मध्ये फेरवनाेवा, २००६ मध्ये टीम जिस्टचा वापर.
 • For the first time, World Cup matches on 'Telstar-18'
  2010 मध्ये जबुलानी नावाचा चेंडू. याला केवळ अाठ पॅनल लावले हाेतेे. यामुळे शाॅट अंतराचा अंदाज बांधणे कठीण हाेते. त्यामुळे यावर बहिष्काराचा गाेलरक्षकांचा विचार हाेता. २०१४ मध्ये ब्रजुका चेंडू अाला.

Trending