Home | Sports | Other Sports | Juevre enters quarterfinals; Serena, Kiss, Thimchi's next

ज्वेरेव उपांत्यपूर्व फेरीत दाखल; सेरेना, किज, थिएमची अागेकूच

वृत्तसंस्था | Update - Jun 04, 2018, 07:14 AM IST

जर्मनीच्या २१ वर्षीय टेनिस स्टार ज्वेरेवने रविवारी राेमहर्षक विजय नाेंदवताना फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फ

 • Juevre enters quarterfinals; Serena, Kiss, Thimchi's next

  पॅरिस - जर्मनीच्या २१ वर्षीय टेनिस स्टार ज्वेरेवने रविवारी राेमहर्षक विजय नाेंदवताना फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासाठी त्याला साडेतीन तास शर्थीची झंुज द्यावी लागली. दुसरीकडे डाेमिनिक थिएमसह माजी नंबर वन सेरेना विल्यम्सनेही स्पर्धेतील अागेकूच कायम ठेवली.


  सातव्या मानांकित डाेमिनिक थिएमने अंतिम अाठमध्ये प्रवेश केला. त्याने जपानच्या केई निशिकाेरीचा पराभव केला. त्याने दाेन तास २८ मिनिटांत विजयाची नाेेंद केली. त्याने ६-२, ६-०, ५-७, ६-४ अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. अाता त्याला उपांत्यपूर्व फेरीत ज्वेरेवच्या अाव्हानाचा सामना करावा लागणार अाहे.


  सेरेनाने महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत ज्युलिया जाॅर्जेसला पराभूत केले. तिने अाक्रमक सर्व्हिस करताना सरळ दाेन सेटमध्ये एकतर्फी विजय नाेंदवला. तिने ६-३, ६-४ ने सामना जिंकला. यासह तिने चाैथी फेरी गाठली. अाता हीच विजयाची लय कायम ठेवत अंतिम फेरी गाठण्याचा तिचा मानस अाहे. यासाठी कसून मेहनत घेत असल्याचेही तिने सांगितले. काळ्या ड्रेसमुळे सध्या सेरेनाही चर्चेत अाहे. त्यामुळे सर्वांची स्पर्धेत तिच्यावर नजर अाहे. दीड वर्षांनंतर ग्रँडस्लॅम किताब जिंकण्याच्या इराद्याने सेरेना यंदा याठिकाणी खेळत अाहे.

  १२ व्या मानांकित कर्बरने महिला एकेरीच्या चाैथ्या फेरीत प्रवेश केला. तिने तिसऱ्या फेरीच्या लढतीत बेर्टेन्सवर मात केली. तिने ७-६, ७-६ अशा फरकाने विजय नाेंदवला. यामुळे तिला पुढची फेरी गाठता अाली.

  ज्वेरेवची मॅरेथाॅन लढतीत शर्थीची झंुज
  दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर ज्वेरेवला मॅरेथाॅन लढतीत शर्थीची झुंज दिली. त्यामुळे त्याला अंतिम अाठमध्ये प्रवेश करता अाला. त्याने चाैथ्या फेरीत रशियाच्या कारेन खाचानाेवचा पराभव केला. त्याने तब्बल साडेतीन तास रंगलेला सामना ४-६, ७-६, २-६, ६-३, ६-३ अशा फरकाने जिंकला. यासह त्याने खाचानाेवला बाहेरचा रस्ता दाखवला. रशियाच्या खेळाडूने दमदार सुरुवात करताना ज्वेरेवला चांगलेच झंुजवले. मात्र, त्याचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. अाता ज्वेरेवचा सामना थिमएशी हाेईल.

 • Juevre enters quarterfinals; Serena, Kiss, Thimchi's next

Trending