आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्बर, फेडरर, याेकाे विजयी; मारिया शारापाेवाचा पराभव; नंबर वन सिमाेना हालेपचा महिला गटात शानदार विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- माजी नंबर वन नाेवाक याेकाेविक, स्वीस किंग राॅजर फेडरर अाणि एंजेलिक कर्बरने शानदार विजय संपादन करून अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेतील अापली अागेकूच कायम ठेवली. याशिवाय भारताच्या लिएंडर पेस, दिविज शरणने अापापल्या सहकाऱ्यांसाेबत दुहेरीत विजय संपादन करून प्री क्वार्टरमध्ये धडक मारली. दुसरीकडे माजी नंबर वन मारिया शारापाेवाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यापाठाेपाठ पुरुष गटात जुअान मार्टिन डेल पेत्राेलाचेही स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.   


नंबर वन सिमाेना हालेपने महिला एकेरीत डेव्हिसवर ४-६, ६-४, १५-१३ ने विजय मिळवला. पुरुष गटात फेबियानाे फाेगिनीने बिगरमानांकित बेन्नेटेऊवर ३-६, ६-२,६-१, ४-६, ६-३  ने मात केली.    
तसेच पाचव्या मानांकित डेव्हिड थिएमने अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. त्याने लढतीमध्ये २६ व्या मानांकित मान्नारिनाेचा पराभव केला. त्याने ६-४, ६-२, ७-५ अशा फरकाने विजय संपादन केला.   
फेडररची गास्केटवर मात

दुसऱ्या मानांकित राॅजर फेडररने २९ व्या मानांकित रिचर्ड गास्केटवर मात केली. त्याने ६-२, ७-५, ६-४ ने सामना जिंकला. यामुळे त्याला अंतिम १६ मधील अापला प्रवेश निश्चित करता अाला.     


बर्डिचचा पेत्राेवर विजय

टाॅमस बर्डिचने पुरुष एकेरीमध्ये १२ व्या मानांकित जुअान मार्टिन डेल पेत्राेला धूळ चारली. त्याने यात सनसनाटी विजयाची नाेंद केली. १९ व्या मानांकित बर्डिचने ६-३, ६-३, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला.

 

याेकाेविक विजयी
सहा वेळच्या चॅम्पियन नाेवाक याेकाेविकने अापल्या माेहिमेला कायम ठेवताना सामना जिंकला. त्याने लढतीमध्ये २१ व्या मानांकित रामाेस-विनाेलासचा पराभव केला. त्याने ६-२, ६-३, ६-३ ने  बाजी मारली. यामुळे त्याला उपउपांत्यपूर्व फेरी गाठता अाली. याेकाेविक हा सातव्या किताबाच्या इराद्याने  खेळत अाहे.   

 

कर्बरविरुद्ध मारिया शारापाेवा पराभूत 
 महिला गटात २१ व्या मानांकित एंजेलिक कर्बरने अंतिम ३२ मध्ये सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने माजी नंबर वन मारिया शारापाेवाला पराभूत केले. तिने सरळ दाेन सेटमध्ये ६-१, ६-३  ने सहज विजय संपादन केला. या पराभवाने शारापाेवाचे बंदीनंतर किताबाचे स्वप्न भंगले. तिला सुमार खेळीचा फटका बसला. 

बातम्या आणखी आहेत...