Home | Sports | Other Sports | Lionel Messi's hat-trick won Argentina in the pre-warming match of the Football World Cup

लियोनेल मेसीच्या हैट्रीकने फुटबॉल विश्वचषकाच्या पूर्व सराव सामन्यात अर्जेंटिना विजयी

वृत्तसंस्था | Update - May 31, 2018, 01:00 AM IST

जगातील सर्वात यशस्वी स्ट्रायकर्स लियोनेल मेसीच्या शानदार हॅट््ट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषकाच्या पूर्व स

 • Lionel Messi's hat-trick won Argentina in the pre-warming match of the Football World Cup
  हैतीच्या मिशेल कॅनव्हेटच्या ताब्यातून चेंडू घेण्याचा प्रयत्न करताना अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू डी मारिया.

  ब्यूनस आयर्स - जगातील सर्वात यशस्वी स्ट्रायकर्स लियोनेल मेसीच्या शानदार हॅट््ट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषकाच्या पूर्व सराव सामन्यात हैती संघावर ४-० ने एकतर्फी विजय मिळवला. इतर एका सामन्यात दक्षिण अमेरिकन टीम पेरूनेदेखील स्कॉटलंडवर २-० ने सहज मात केली. मेसीने शानदार कामगिरी करत सर्वांना धोक्याची सूचना दिली.

  मेसीने सामन्याच्या १७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटपूर्वी गोल करत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाच्या खेळाडूने दुसऱ्या हाफमध्ये १२ मिनिटांनंतर दुसरा गोल केला. दबावात आलेल्या हैती संघाविरुद्ध ६५ व्या मिनिटाला पुन्हा मेसीने गोल करत आपली हॅट््ट्रिक साजरी केली. विरोधी खेळाडूंची रणनीती त्याच्यापुढे फिकी पडली. त्यानंतर दोनच मिनिटांत लगेच सर्जियो एगुएरोने एक गोल करत आपल्या अर्जेंटिना संघाला ४-० ने आघाडीवर नेले. सामन्यात अर्जेंटिनाचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू झेव्हियर जानेटीचा विक्रम मोडीत काढत झेव्हियर माशेरानोने आपल्या संघासाठी सर्वाधिक १४३ सामने खेळण्याचा विक्रम बनवला. हैती संघ सध्या जागतिक क्रमवारीत १०८ व्या स्थानी आहे.

  पुढील स्लाईडवर पहा आणखी फोटो .....

 • Lionel Messi's hat-trick won Argentina in the pre-warming match of the Football World Cup
  लियोनेल मेसी

Trending