आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाई-वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ, मदत न मिळाल्याने टेनिस साेडून सायकलिंगचा छंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जन्मानंतर अवघ्या १८ महिन्यांत पाेलिअाेने चिमुकल्या मधू बागरीचा शरीराचा कंबरेखालील भाग अपंग झाला. या अाघातातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मधुवर पुन्हा एक संकट काेसळले. तिच्या अाई-वडिलांचा मृत्यू झाला.  यानंतर तिच्या नातेवाइकांनीही तिची साथ साेडून दिली. त्यामुळे ती एकाकी पडली. मात्र, या साऱ्या परिस्थितीचा सामना करतानाच तिने वयाच्या तिसऱ्या वर्षी स्पाेर्टस अकादमीमध्ये प्रवेश मिळवला. यादरम्यान तिने व्हीलचेअर टेनिस खेळण्यास सुरुवात केली. तिला यातही प्रावीण्य मिळवण्यास सुरुवात केली. असे असताना तिला काेणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. त्यामुळे तिच्यावर अाता हा खेळ साेडण्याचेही संकट येण्याचे चित्र हाेते. मात्र, तिने पॅरासायकलिंंग करण्यास सुरुवात केली. नित्याच्या सरावातून तिने अल्पावधित या खेळातील  कामगिरीचा दर्जा उंचावला.  


अाजपासून म्यानमारमध्ये सायकलिंग

म्यानमार येथे शुक्रवारपासून एशियन पॅरा सायकलिंग चॅम्पियनशिपला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत भारताचा संघ सहभागी झाला अाहे. यातील महिला गटात भारताचे प्रतिनिधित्व करणारी मधू ही एकमेव महिला खेळाडू अाहे. तिने उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर या स्पर्धेसाठी भारतीय संघातील अापला प्रवेश निश्चित केला. या स्पर्धेत तिला पदकाची अाशा अाहे. यासाठी मेहनत घेणार असल्याचे तिने या वेळी सांगितले.   


व्हीलचेअर टेनिस चॅम्पियन

 वडिलांच्या निधनानंतर दिव्यांग मधू ही अापल्या अाईसाेबत राहत हाेती. दरम्यान काही महिन्यातच तिच्या अाईचेही निधन झाले. त तिने व्हीलचेअर टेनिसमध्ये कसून मेहनत घेतली.  राष्ट्रीय व्हीलचेअर टेनिस स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...