आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मँचेस्टर सिटीचा विक्रमी विजय; नाॅकअाऊटमध्ये बासेलवर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बासेल- इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीगच्या राउंड अाॅफ -१६ च्या पहिल्या लेगमध्ये बासेलचा पराभव केला. सिटीने ४-० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. मँचेस्टर सिटीचा हा या स्पर्धेतील सर्वात माेठ्या फरकाने मिळवलेला विक्रमी विजय ठरला. अाता दुसऱ्या लेगचा सामना ७ मार्च राेजी मँचेस्टरच्या एतिहाद स्टेडियमवर हाेणार अाहे. दाेन्ही लेगच्या एकूण स्काेररच्या बळावर उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र टीमची निवड हाेईल.  

 
मँचेस्टर सिटीकडून इलके गुंडाेगनने दाेन, बर्नाडाे सिल्वा अाणि सर्जियाे एगुएराेने सामन्यात प्रत्येकी एक गाेल केला. या सामन्यासाठी क्लबचे प्रमुख प्रशिक्षक पेप गुअार्डिअाेलाने दाेन माेठे बदल केले हाेते. त्यांनी डिफेंडर विन्सेंट काेम्पनी अाणि फेबियन डेल्फला संघात सहभागी केले हाेते.   


मँचेस्टर सिटीच्या गंुडाेगनने १४ व्या मिनिटाला  सेंट जेकब पार्क स्टेडियमवर गाेलचे खाते उघडले. त्यामुळे सिटीला सामन्यात अाघाडी घेता अाली. त्यानंतर सिल्वाने अवघ्या चार मिनिटांत सिटीच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. त्याने वैयक्तिक पहिला अाणि सिटीकडून दुसऱ्या गाेलची नाेंद केली. त्यानंतर स्ट्रायकर एगुएराेने पाच मिनिटांमध्ये सिटीला ३-० ने अाघाडी मिळवून दिली. त्याने २३ व्या मिनिटाला गाेल केला. दुसऱ्या हाफमध्ये गुंडाेगनने ५३ व्या मिनिटांला वैयक्तिक दुसरा व चाैथा गाेल केला.

 

नंबर गेम

> ६५० दिवसांनंतर  लीगमध्ये काेम्पनीने   सामना खेळला

 

> १४ गाेल एगुएराेचे २०१८ मध्ये नाेंद. त्याचे यंंदा सत्रात २९ गाेल    

> २८ सामने सिल्वाचे पराभवाशिवाय.  लीगमधील एकमेव.  

 

> १६ विजय सिटीचे यंदाच्या सत्रातील एकूण २१ सामन्यात.

 

युवेंट्स-टाॅटेनहॅम सामना ड्राॅ, घरच्या मैदानावरील पराभव सातव्यांदा टाळला

गत वेळच्या फायनलिस्ट युवेंट्सने अापल्या घरच्या मैदानावरील पराभव टाळला. युवेंट्स अाणि टाॅटेनहॅम लढत २-२ ने बराेबरीत राहिली. त्यामुळे काेणत्याही इंग्लिश टीमला चॅम्पियन्स लीगमध्ये यजमान युवेंट्सला सलग सातव्यांदा घरच्या मैदानावर पराभूत करता अाले नाही. युवेंट्सकडून गाेंजालाे हिंगुएनने दुसऱ्या अाणि नवव्या मिनिटांला गाेल केले. त्यामुळे टीमला अाघाडी मिळाली. मात्र, टाॅटेनहॅमकडून हॅरी केनने ३५ व्या अाणि क्रिस्टियन एरिकसनने ७१ व्या मिनिटाला गाेल केले. त्यामुळे ही लढत बराेबरीत राहिली. युवेंट्सच्या गाेलरक्षक जियानलुईजी बुफाेनला ६५४ मिनिटांपर्यंत एकाही चेंडूने हुकलावणी दिली नव्हती. हॅरी केनने लीगमध्ये एकाच सत्रात सर्वाधिक गाेल करणाऱ्या इंग्लिश फुटबाॅलपटू स्टीव्हन गेरार्डची बराेबरी साधली. गेरार्डने २००८-०९ ने मध्ये सात गाेल केले हाेते. अाता ८ मार्च राेजी युवेंट्स अाणि टाॅटेनहॅम यांच्यातील दुसऱ्या लेगचा सामना वेंम्बले स्टेडियमवर हाेईल. या सामन्यावर सर्वांची नजर असेल

 

 

बातम्या आणखी आहेत...