Home | Sports | Other Sports | Mary Com's retreat from Asian to prepare for the World Championship

वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी मेरी काेमची एशियनमधून माघार

दिव्य मराठी | Update - Jun 01, 2018, 06:51 AM IST

अागामी अाॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे एशियन स्पर्धा रंगणार अाहे. या स्पर्धेमधून पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन बाॅक्सर मेरी

  • Mary Com's retreat from Asian to prepare for the World Championship

    नवी दिल्ली - अागामी अाॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे एशियन स्पर्धा रंगणार अाहे. या स्पर्धेमधून पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन बाॅक्सर मेरी काेमने माघार घेण्याचा संकेत दिला. गत चॅम्पियन मेरी काेम अागामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी हाेणार अाहे. त्यामुळे तिने अाता एशियन गेम्समधून माघारची तयारी दर्शवली.


    तिने गतवर्षी एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली हाेती. त्यामुळेच अाता तिची नजर जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदकावर लागली अाहे. मेरी काेम ४८ किलाे वजन गटामध्ये अापले काैशल्य पणास लावेल. त्यामुळे तिला एशियन गेम्समध्ये सहभागी हाेता येणार नाही. कारण, या स्पर्धेत महिलांच्या ५१, ५७ अाणि ६० किलाे वजन गटांचा समावेश अाहे. यातूनच मेरी काेमने ५१ किलाे वजन गटात सहभागी हाेण्यास नकार दिला. यातूनच तिला विश्रांती घ्यावी लागणार अाहे. यामुळे तिला जागतिक स्पर्धेच्या तयारीची माेठी संधी अाहे. यासाठी तिनेही अापण सज्ज असल्याची प्रतिक्रीया दिली.

Trending