आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला शेवटची संधी; पराभवाने होणार पॅकअप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ अाता  शेवटच्या संधीला सार्थकी लावताना बुधवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमधील अापले अाव्हान कायम ठेवण्यासाठी सज्ज अाहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई अाणि अार.अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगणार अाहे.

 

सुमार कामगिरीमुळे या दाेन्ही संघांना अापली लय गमवावी लागली. अाता पुन्हा दबदबा निर्माण करताना प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा मजबूत करण्याचा मुंबई अाणि पंजाब संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यावर सर्वांची नजर असेल. कारण यजमान मुंबई इंडियन्स संघासाठी ही शेवटची संधी अाहे. यातील पराभवाने अाता मुंबईचे स्पर्धेतील  अाव्हान संपुष्टात येईल. मुंबईला अातापर्यंत १२ पैकी पाच सामन्यांत विजय संपादन करता अाला. त्यामुळे टीमचे १० गुण अाहेत.
दुसरीकडे पंजाब संघासाठी हीच परिस्थिती अाहे. कारण गत सामन्यात पंजाबला पराभवाला सामाेरे जावे लागले.

 

याच पराभवाने पंजाबची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली. त्यामुळे अव्वल तीनमधील स्थान गमावल्याने पंजाबचा संघ अडचणीत सापडला. अाता पुन्हा लयीत येऊन हे स्थान गाठण्याचा पंजाबचा मानस अाहे. मात्र, यासाठी टीमला माेठी कसरत करावी लागेल. पंजाबने अातापर्यंत १२ पैकी सहा सामन्यांत विजयाची नाेंद केली.

बातम्या आणखी आहेत...