आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदाल अकराव्यांदा फायनलमध्ये; थिएमने पहिल्यांदा मारली धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - जगातील नंबर वन टेनिस स्टार राफेल नदालने अाता अकराव्यांदा फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. असे करणारा ताे जगातील पहिला टेनिसपटू ठरला.  त्याने शुक्रवारी एकेरीच्या उपांत्य सामन्यात जुअान मार्टिन डेल पेत्राेचा पराभव केला. त्याने ६-४, ६-१, ६-२  अशा फरकाने सामना जिंकला. अाता एकेरीच्या किताबासाठीचा त्याचा अंतिम सामना थिएमशी हाेईल. थिएमने करिअरमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली अाहे.

 
सिमाेना-स्टीफन्स अाज झंुजणार
सिमाेना हालेप अाता अापल्या करिअरमध्ये पहिला ग्रँडस्लॅम किताब जिंकण्यासाठी उत्सुक अाहे. या साेनेरी यशापासून ती अवघ्या एका पावलावर अाहे. अाता हा पल्ला गाठण्यासाठी तिने कंबर कसली. यासाठी तिला अमेरिकन अाेपन चॅम्पियन स्लाेएन स्टीफन्सच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. यातील विजयाने तिला पहिला  ग्रँडस्लॅम किताब जिंकता येईल. शनिवारी महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेची स्लाेएन स्टीफन्स अाणि राेमानियाची सिमाेना हालेप समाेेरासमाेर असतील. अमेरिकेच्या स्टीफन्सची नजर अाता करिअरमधील दुसऱ्या  ग्रँडस्लॅम किताबाकडे लागली अाहे. तिने गतवर्षी अमेरिकन अाेपनचे विजेतेपद पटकावले.    
सिमाेनाचे अाता अजिंक्यपदाचे लक्ष्य : दाेन वेळच्या उपविजेत्या सिमाेना हालेपची नजर अाता अजिंक्यपदाकडे लागली. तिला या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाेन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, अाता २०१८ मध्ये अंतिम सामना जिंकण्याचा तिचा मानस अाहे. तिने तिसऱ्या मानांकित मुगुरुझाचा पराभव केला अाणि अंतिम फेरी गाठली. 

 

नदालची नजर ११ व्या किताबावर
स्पेनच्या राफेल नदालची नजर अाता अकराव्यांदा फ्रेंच अाेपन किताब जिंकण्याकडे लागली. यासाठी त्याने उपांत्य सामन्यात शर्थीची झुंज दिली. त्याने पाचव्या मानांकित डेल पेत्राेला पराभूत केले. त्याने सरळ तीन सेटवर सामना जिंकला. यासाठी त्याने दाेन तास १४ मिनिटे झंुज दिली. त्यामुळे त्याला अंतिम फेरीचा पल्ला यशस्वीपणे गाठता अाला. 

 

बातम्या आणखी आहेत...