आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहा संघर्षमय प्रवास ब्राझीलच्या शॅपक्वेन्स फुटबाॅल क्लबचा. त्यांनी विमान अपघातामध्ये १९ खेळाडूंच्या मृत्यूनंतरही मैदानावर पुनरागमन केले. यासाठी ब्राझीलमधील क्लबने प्रत्येकी एक खेळाडू लाेन बेसवर देण्याची तयारी दर्शवली हाेती. मात्र, मेनिन्हाेने हा प्रस्ताव नाकारला अाणि ३० दिवसांत टीम तयार करण्याचा शब्द दिला हाेता. त्यांनी २० दिवसांत संघ तयार केला. याच टीमने सहा महिन्यांत ट्रॉफी जिंकली.
त्या दिवशी अापच्या शॅपकाे शहरातील प्रत्येक जण हा रस्त्यावर उभा राहून अश्रू ढाळत हाेता. मुसळधार पाऊसही सुरू हाेता. अशाही परिस्थितीत जमलेल्या प्रत्येकच्या डाेळ्यातील अश्रूंचीही संततधार कायम हाेती. सर्वांनी काळे कपडे घातले अाणि याच गर्दीमध्ये ४२ जणांचे शव हाेते. अाम्ही या मृतदेहांना दफन करण्यासाठी जात हाेताे. २९ नाेव्हेंबर २०१६ राेजी काेलंबियाला रवाना झालेल्या विमानाला भीषण अपघात झाला. याच अपघातामध्ये माझा पूर्ण संघच गारद झाला. सर्वच खेळाडूंचे यात अपघाती निधन झाले. या सर्व अपघातामध्ये एकूण ७१ जण मृत्युमुखी पडले हाेते. यात माझ्या क्लबच्या ४२ जणांचा समावेश हाेताे. यात १९ खेळाडू, १४ काेचिंग स्टाफ अाणि ९ संघ व्यवस्थापकांचा समावेश हाेता. या अपघातामध्ये केवळ सहाच व्यक्तींना अापले प्राण वाचवता अाले. यात तीन खेळाडू हाेते. गाेलकीपर जॅक्सन फाॅलमन, डिफेंडर हेलियाे नेटाे अाणि अॅलेन रुशेल हे तिघे सुदैवाने वाचले.
अामचा शॅपक्वेन्स क्लब काेलंबियातील प्रतिष्ठेच्या काेपा सुदामेरिकाना स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी रवाना झाला हाेता. या अपघातानंतर प्रतिस्पर्धी अॅथलेटिकाे टीमने अापल्याला चॅम्पियन घाेषित करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या काेचने अापल्या विजेता घाेषीत केले. ट्राॅफी अाणि बक्षिसाची रक्कमही दिली. या अपघातानंतर ब्राझीलमधील सर्वच क्लबने अापल्या प्रत्येकी एक खेळाडू लाेनवर देण्याची तयारी दर्शवली हाेती. यासाठी त्या सर्व क्लबचा पुढाकार माझ्यासाठी महत्त्वाचा हाेता. मात्र, मीच हा प्रस्ताव नाकारला.
या सर्वांना मी शब्द दिला की, येत्या ३० दिवसांत मी याच ताकदीचा दुसरा संघ तयार करेल. दरम्यान, माझ्याकडे यासंबंधीची काेणतीही पूर्वयाेजना तयार नव्हती. याच विचारात मी गढून गेलाे हाेताे. दरम्यान, मला त्या सर्वांची अाठवण अाली. ज्यांच्या बळावर मी हा क्लब उभा केला. क्लबच्या स्टाफमध्येही अाता काही व्यक्तीच उरल्या हाेत्या. ६ खेळाडू, एक गाेलरक्षक प्रशिक्षक, २ फिजिअोेथेरपिस्ट, २ लाॅकर रूम स्टाफ, एक डेटा अॅनालिस्ट, एक डाॅक्टर अाणि एक नर्स. हे सर्व या विमान अपघातापासून वाचले हाेते. यादरम्यान सर्वजण अापल्याच शहरात हाेते. या सर्वांना साेबत घेऊन मी नव्याने अापला संघ तयार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, टीम मॅनेजर पदावर काेणाची निवड करायची हाच माेठ प्रश्न भेडसावत हाेता. मात्र, मी अवघ्या १० दिवसांत हा प्रश्नही साेडवला.
अाता खेळाडूंच्या निवडीचा प्रश्न माझ्यासमाेर हाेता. मी लगेच अशा काही खेळाडूंची निवड केली, की जे केवळ ब्राझीलमध्येच राहू इच्छितात. त्यांच्याशी चर्चा केली. सकाळी ८ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत मी यावर काम करू लागलाे. यात ९ युवा खेळाडूंचा समावेश हाेता. तसेच क्लबला साेडून गेलेल्या त्या सर्व खेळाडूंनीही कमबॅक करताना माझा अात्मविश्वास दुणावला. अामचा पहिला सामना जानेवारी २०१७ मध्ये हाेता. हा मैत्रीपूर्ण सामना पाहण्यासाठी २० हजार फुटबाॅल प्रेमी उपस्थित हाेते. याशिवाय अपघातातून वाचलेल्या त्या तिघांचीही उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. या तिघांचाही गाैरव करण्यात अाला. सामन्याला सुरुवात झाली. अाम्ही ७१ व्या मिनिटाला सामन्याला थांबवण्याची विनंती केली. कारण यादरम्यान अाम्ही मृतांना श्रद्धांजली वाहिली. कारण या विमान अपघातात ७७ पैकी ७१ जण ठार झाले हाेते. अाम्ही सरस कामगिरी करतांना सामना जिंकला. अाम्हाला सहा महिन्यात पहिल्या किताबावर नाव काेरता अाले.
ब्राझीलच्या क्लबने प्रत्येकी एक खेळाडू देण्याचा प्रस्ताव ठेवला हाेता, मात्र मीच ताे नाकारला...
- पिलिनियाे डेव्हिड डी नेस, संघ सहमालक
बार्सिलाेनाने खेळला मैत्रिपूर्ण सामना
स्पॅनिश फुटबाॅल क्लब बार्सिलाेनाने शॅपक्वेन्से टीमला प्रेरित करण्यासाठी मैत्रिपूर्ण सामना खेळला. यातून युवांचा अात्मविश्वास द्विगुणित हाेण्याचा फायदा झाला. यासाठी मेसी, लुईस सुअारेझचे माेलाचे याेगदान राहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.