आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIFA WORLD CUP : 84 वर्षांत यजमानांचा सलामीला मोठा विजय; रशियाने जिंकला 5-0 ने सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माॅस्काे - यजमान रशियाने अापल्या घरच्या मैदानावर फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यजमानांनी सलामीच्या सामन्यात साैदी अरेबियावर एकतर्फी विजयाची नाेंद केली. रशियाने ५-० अशा फरकाने सामना जिंकला. युरी गाझिनस्की (१२ वा मि.), डेनिस (४३, ९१ वा मि.), अर्टेम डायुबा (७१ वा मि.) अाणि अलेक्सांद्रे गाेल्विन (९४ वा मि.) यांनी गाेल करून रशियाला शानदार विजय मिळवून दिला. यासह ८४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यजमान संघाने सलामीला माेठ्या फरकाने विजयाची नाेंद केली. प्रत्युत्तरात साैदी अरेबियाच्या खेळाडूंना शेवटपर्यंत एकही गाेल करता अाला नाही. त्यामुळे या टीमला पराभवाचा सामना करावा लागला.       


युरीने केला पहिला गाेल

यजमान रशियाकडून युरी गाझिनस्कीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिल्या गाेलची नाेंेद केली. त्याने १२ व्या मिनिटाला गाेल केला. यासह त्याने स्पर्धेत अापल्या नावे पहिला गाेल नाेंदवला. यामुळे रशियाच्या टीमलाही मैदानावर दमदार सुरुवात करता अाली. या गाेलने यजमानांनी सामन्यावर पकड केली. 


डेनिस, अर्टेमने गाजवला सामना 

रशियाच्या डेनिस अारि अर्टेम डायुबाने सुरेख खेळीने सामना गाजवला. डेनिसने ४३ व्या मिनिटाला गाेल केला. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये रशियाने अाघाडी घेतली. मध्यंतरानंतर अर्टेम डायुबाने ७१ व्या मिनिटाला गाेल केला. तसेच अलक्सांद्रे गाेल्विननेही अतिरिक्त वेळेत गाेल केला. 

 

बातम्या आणखी आहेत...