आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pogba's Gayle Beat France In Australia; Iceland Retains Messi's Argentina Team

पाेग्बाच्या गाेलने फ्रान्सची अाॅस्ट्रेलियावर मात; अाइसलँडने मेसीच्या अर्जेंटिना संघाला राेखले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात गाेल करताना फ्रान्सचा संघाचा पाेल पाेग्बा. त्याने ८० व्या मिनिटाला हा गाेल केला. - Divya Marathi
अाॅस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात गाेल करताना फ्रान्सचा संघाचा पाेल पाेग्बा. त्याने ८० व्या मिनिटाला हा गाेल केला.

कझान - युराे चॅम्पियनशिपमधील उपविजेत्या फ्रान्स संघाने शनिवारी फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. पाेल पाेग्बाने (८० वा मि.) निर्णायक गाेल करून फ्रान्सला विजय मिळवून दिला. या गाेलच्या अाधारे फ्रान्सने सी गटातील अापल्या पहिल्या सामन्यात अाॅस्ट्रेलियावर मात केली. फ्रान्स संघाने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. संघाच्या विजयात ग्रिझमेननेही (५८ वा मि.) एका गाेलचे महत्त्वाचे याेगदान दिले. त्यामुळे फ्रान्सला पहिला सामना सहज जिंकता अाला. अाॅस्ट्रेलियासाठी जेडीनाकने ६२ व्या मिनिटाला गाेल केला. मात्र, या टीमचा सामन्यातील हा एकमेव गाेल ठरला.    


कझानच्या मैदानावर सरस खेळी करताना फ्रान्सने विजयाची नाेंद केली. अाता फ्रान्सचा दुसरा सामना २१ जून राेजी पेरू संघाशी हाेईल. तसेच सलामीचा सामना गमावणाऱ्या अाॅस्ट्रेलियाला याच दिवशी डेन्मार्कच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. 

 
ग्रिझमेन, पाेग्बाची सरस कामगिरी : मध्यंतरापर्यंत बराेबरीतील सामन्याला फ्रान्सच्या ग्रिझमेनने कलाटणी दिली. त्याने ५८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनाल्टीला सार्थकी लावली. यासह त्याने टीमकडून गाेलचे खाते उघडले. यातून फ्रान्सने सामन्यात १-० ने अाघाडी घेतली. त्यानंतर अाॅस्ट्रेलियाने बराेबरी साधली. पाेग्बाने ८० व्या मिनिटाला अापल्या टीमचा विजय निश्चित केला.  

 

जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या अाइसलँड संघाने सरस खेळीच्या बळावर विश्वचषकातील सलामी सामन्यातील अापला पराभव टाळला. या संघाने  डी गटातील पहिल्या सामन्यात लियाेनेल मेसीच्या अर्जेंटिना संघाला बराेबरीत राेखले. त्यामुळे हा सामना १-१ ने बराेबरीत राहिला.  अल्फ्रेंड फिनबाेगसनाने २३ व्या मिनिटाला सुरेख गाेल करून अाइसलँडच्या टीमला बराेबरी मिळवून दिली. हीच  खेळी  कायम ठेवताना या संघाने सामना बराेबरीत ठेवला. अर्जंेटिनाकडून सर्जियाे अायुर्गाेने १९ व्या मिनिटाला पहिला गाेल केला. यासह अापल्या टीमला अाघाडी मिळवून दिली हाेती. मात्र, जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या अर्जंेटिनाला अापली ही अाघाडी कायम ठेवता अाली नाही. त्यामुळे टीमचा सामना बराेबरीत राहिला.


दरम्यान,  या सामन्यात सुपरस्टार लियाेनेल मेसीच्या अपयशाचा माेठा फटका अर्जेंटिना टीमला बसला. यातूनच या टीमचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. त्याचा दाेन वेळा पेनल्टीवर गाेल करण्याचा प्रयत्न अपयशी राहिला.   

 

डेन्मार्ककडून पेरूचा  १-० ने पराभव

जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्क संघाने विश्वचषकात शानदार विजयाची नाेंद केली. या संघाने पहिल्या सामन्यात पेरूचा पराभव केला. डेन्मार्कने रंगतदार सामना १-० अशा फरकाने जिंकला. पाेऊल्सेनने (५९ वा मि.) गाेल करून डेन्मार्कला विजय मिळवून दिला. यासह डेन्मार्कने स्पर्धेत चांगली सुरुवात केली. अाता या टीमचा दुसरा सामना २१ जुन राेजी अाॅस्ट्रेलियाशी हाेईल. 

 

चार मिनिटांत साधली हाेती बराेबरी 
दुसऱ्या हाफमध्ये पिछाडीवर पडलेल्या अाॅस्ट्रेलियाने गाेलसाठी शर्थीची झंुज दिली. त्यामुळे टीमच्या खेळीला वेग अाला. दरम्यान, जेडीनाकने अवघ्या ४ मिनिटांत अाॅस्ट्रेलिया संघाला बराेबरी मिळवून दिली. त्याने ६२ व्या मिनिटाला गाेल केला. यासह अाॅस्ट्रेलियाने १-१ ने बराेबरी साधली हाेती.

 

 

बातम्या आणखी आहेत...