Home | Sports | Other Sports | Random Ice Cream Seller Gets House, Job And Cash All Of A Sudden

एका Ice Cream च्या बदल्यात दिले घर, गाडी अन् नोकरी; कोण होता तो?

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 30, 2018, 04:00 PM IST

फिलिपाइन्समध्ये एका आइसक्रीम विक्रेत्याला एका झटक्यात घर, नोकरी आणि रोख रक्कम मिळाली आहे.

 • Random Ice Cream Seller Gets House, Job And Cash All Of A Sudden

  मनिला - फिलिपाइन्समध्ये एका आइसक्रीम विक्रेत्याला एका झटक्यात घर, नोकरी आणि रोख रक्कम मिळाली आहे. दैनंदिन आइसक्रीम विकून आपला आणि आपल्या 3 मुला-मुलींचा उदरनिर्वाह भागवतो. नुकतेच त्याला हृदयविकाराचा झटका बसला होता. असेच एकेदिवशी आइसक्रीम विकत असताना त्याला जे काही मिळाले त्याचे त्याने कधी स्वप्नातही पाहिले नसेल. त्याचे अवघे आयुष्य बदलणारा तो सेलिब्रिटी कोण आणि नेमके काय घडले याबद्दल जाणून घेऊ...


  काय घडले?
  > फेसबूक यूझर जेन मनिले यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या फिलिपाइन्सचा इंटरनॅशनल बॉक्सर आणि विद्यमान सिनेटर मॅनी पॅक्वीनोसोबत दिसून येत आहेत. सोबतच, एक आइसक्रीम ओनर सुद्धा आहे. हा व्हिडिओ आपणच काढला आणि पॅक्वीनोसोबत होतो असे त्यांनी सांगितले.
  > मॅनी पॅक्वीनो फिलिपाइन्सच्या राजधानीत फिरत असताना त्याची नजर आइसक्रीम विक्रेत्याकडे गेली. पॅक्वीनोच्या सांगण्यावरून जेन यांनी आपल्यासह सर्वांसाठी एक-एक अशा 10 आइसक्रीम विकत घेतल्या. आइसक्रीम खास असताना पॅक्वीनो त्या विक्रेत्याला आपल्याकडे बोलावले.
  > पॅक्वीनोच्या जवळ गेल्यानंतरच आपण एका स्टार बॉक्सरशी भेटत असल्याचे त्याच्या लक्षात आले. पॅक्वीनोने त्याची विचारपूस केली तेव्हा त्याला नुकताच हृदयविकाराचा धक्का बसला होता असे कळाले. उपचारासाठी इतका खर्च झाला की मुला-मुलींना शाळेत पाठवणे बंद केले.
  > सुरुवातीला पॅक्वीनोने आपल्या खिशातून 57 डॉलर त्याला दिले. पण, त्याची कहाणी ऐकल्यानंतर एकूण 600 डॉलर दिले. तसेच भाड्याच्या घरात राहतो का? असे विचारले. त्याने होकार देताच, घाबरू नकोस. तुला घर आणि नोकरी सुद्धा देईन असे म्हणत पाठीवर हात ठेवला. हे ऐकूण आइसक्रीम विक्रेत्याच्या डोळ्यात पाणी आले.


  कोण आहे पॅक्वीनो?
  > 2015 मध्ये 'द फाइट ऑफ द सेंचुरी' आयोजित करण्यात आली होती. जगभरात प्रसिद्ध झालेली ही बॉक्सिंग फाइट फ्लायड मेवेदर आणि मॅनी पॅक्वीनो यांच्यात झाली होती.
  > आतापर्यंतची सर्वात महागडी फाइट म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या त्या लढतीत पॅक्वीनोचा पराभव झाला होता. पण, या पराभवानंतरही पॅक्वीनोला रनर-अप म्हणून 25 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात 1,787 कोटी भारतीय रुपये मिळाले होते. तर विजेता मेवेदरने त्याच्या दुपटीपेक्षा जास्त 60 कोटी अमेरिकन डॉलर जिंकले होते.
  > मॅनी पॅक्वीनो केवळ फिलिपाइन्स नव्हे, तर जगभरात स्टार बॉक्सर आहे. बॉक्सिंगनंतर त्याने फिलिपाइन्सच्या राजकारणात प्रवेश केला. तसेच सध्या संसदेतच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्य आहे. तसेच आजही बॉक्सिंगच्या दुनियेत जगात चौथा बेस्ट बॉक्सर आहे.

 • Random Ice Cream Seller Gets House, Job And Cash All Of A Sudden
 • Random Ice Cream Seller Gets House, Job And Cash All Of A Sudden

Trending