आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ranji Champions End Due To Vidarbha; Vijay In The Quarter finals Of The Tournament

रणजी चॅम्प विदर्भाचे अाव्हान संपुष्टात; विजयासह साैराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- रणजी चॅम्पियन विदर्भाच्या टीमला पुन्हा एकदा सुमार खेळीमुळे विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे या टीमचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. दुसरीकडे   चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखाली  साैराष्ट्र टीमने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या टीमने बुधवारी अाठ गड्यांनी विदर्भावर मात केली. दुसरीकडे पराभवानंतरही मुंबईच्या टीमला या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता अाली. या टीमचा अांध्र प्रदेशने पराभव केला.   


साैराष्ट्राच्या धारदार गाेलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाची ४० षटकांत अवघ्या १५९ धावांवर दाणादाण उडाली. प्रत्युत्तरात साैराष्ट्राने ३४ षटकांत २ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. सलामीवीर बाराेत (९१) अाणि कर्णधार चेतेश्वर पुजाराने (४६) अभेद्य शतकी भागीदारीच्या बळावर साैराष्ट्राला झटपट विजय मिळवून दिला. यासह टीमला अव्वल स्थानावर धडक मारता अाली.  


अांध्र प्रदेशची मुंबईवर मात

अांध्र प्रदेश संघाने लढतीत मुंबईवर २९ धावांनी मात केली. यासह टीमला या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करता अाला. 

 

 पुजाराची विजयी भागीदारी 
दाेन विकेट स्वस्तात पडल्याने साैराष्ट्र टीम अडचणीत सापडली हाेती. मात्र, बाराेत अाणि पुजाराने वेळीच संघाचा डाव सावरला. त्यांनी   गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेत १३१ धावांची भागीदारी रचली.  पुजाराने ७४ चेंडूंत ५ चाैकारांस ४६ धावा काढल्या.  बाराेतच्या  ११४ चेंडूत नाबाद ९१ धावा काढल्या.

 

महाराष्ट्रासमाेर अाज त्रिपुरा
बिलासपूरच्या मैदानावर गुरुवारी महाराष्ट्र अाणि त्रिपुरा यांच्यात सामना रंगणार अाहे. महाराष्ट्राचा गत सामना रद्द झाला. अाता या सामन्यात बाजी मारून अापले दुसरे स्थान मजबूत करण्याचा महाराष्ट्राचा प्रयत्न असेल. महाराष्ट्राने चार सामन्यांत दाेन विजय संपादन केले.

बातम्या आणखी आहेत...