आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल होती मिल्खा सिंगची ऑस्ट्रेलियन GF, याचवर्षी भयंकर आजाराने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंह 15 डिसेंबर रोजी आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. जीव याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅथलीट बनवण्यासाठी ऑलिम्पियन वडील मिल्खा सिंग यांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली. स्वतः दारिद्रीत जगलेले मिल्खा यांनी आपल्या मुलाला अमेरिकेतील एबिलेन ख्रिस्चियन विद्यापीठात शिकवले. या निमित्त DivyaMarathi.Com आपल्या वाचकांसाठी मिल्खा सिंगशी संबंधित फॅक्ट्स सांगत आहे. 

 

हे आहे ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडचे सत्य...
>> मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर चित्रपट 'भाग मिल्खा भाग' मध्ये ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडचा उल्लेख करण्यात आला आहे. 
>> मिल्खा यांनी लिहिल्याप्रमाणे, "1956 मध्ये ऑलिम्पिकसाठी ते मेलबर्नला गेले होते. त्या ठिकाणी प्रॅक्टिस करताना माझी भेट ऑस्ट्रेलियन अॅथलीट बॅटी कूथबर्ट हिच्याशी झाली. तिला माझी पगडी खूप आवडली होती. मी तिला पगडी बांधायला शिकवलो. त्याचवेळी आमची मैत्री झाली. मी तिला एक निळ्या रंगाची पगडी गिफ्ट देखील केली होती."
>> "बॅटीने त्यावेळी 3 गोल्ड मेडल जिंकले सोबतच माझे मनही जिंकले. 1962 मध्ये आमची पुन्हा भेट झाली. त्यानंतर मात्र, आमचा संपर्क झाला नाही. 2006 मध्ये मेलबर्नला गेल्यानंतर मी तिला फोन केला होता. मात्र, तिच्या कुटुंबियांनी मला सांगितले की ती मल्टीपल स्केलेरॉसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. तिच्या कुटुंबियांनी मी गिफ्ट केलेली पगडी अजुनही सांभाळून ठेवली आहे."
>> कूथबर्टचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. 


अशी आहे मिल्खा यांची फॅमिली...

- पत्नी निर्मल कौर - माजी नॅशनल व्हॉलिबॉल प्लेअर
- मुलगा जीव मिल्खा सिंग - इंटरनॅशनल गोल्फर
- सून कुदरत - हाउसवाइफ
- नातू - हरजाई सिंग (7 वर्षांचा)
- मुलगी अलीजा - टेक्सटाइल डिझायइनर, त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. 
- मुलगी मोना - डॉक्टर
- मुलगी सोनिया - सायकोलॉजिस्ट - तिला जुळी मुले आहेत

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रियल ऑस्ट्रेलियन अॅथलीट बॅटी कूथबर्ट आणि फॅमिली मेंबर्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...