Home | Sports | Other Sports | Ronald's Comeback; Practice with portugal; World Cup preparations; Tomorrow, fight against Algeria

राेनाल्डाेचे कमबॅक; पाेेर्तुगालसाेबत सराव; वर्ल्डकप तयारी; उद्या अल्जेरियाविरुद्ध लढत

वृत्तसंस्था | Update - Jun 06, 2018, 04:33 AM IST

चॅम्पियन्स लीग चॅम्पियन रिअल माद्रिदचा सुपरस्टार स्ट्रायकर क्रिस्टियानाे राेनाल्डाेने अाता घरच्या मैदानावर कमबॅक केले. त

  • Ronald's Comeback; Practice with portugal; World Cup preparations; Tomorrow, fight against Algeria

    अाेईरेस - चॅम्पियन्स लीग चॅम्पियन रिअल माद्रिदचा सुपरस्टार स्ट्रायकर क्रिस्टियानाे राेनाल्डाेने अाता घरच्या मैदानावर कमबॅक केले. ताे अाता अापल्या राष्ट्रीय संघात सहभागी झाला. यातूनच त्याने पाेर्तुगाल फुटबाॅल संघासाेबत अापल्या घरच्या मैदानावर फिफाच्या विश्वचषकासाठीच्या तयारीला सुरुवात केली. त्यामुळे ताे संघातील खेळाडूंसाेबत सकाळी प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झाला. दुखापतीमुळे ताे पहिल्या अाठवड्यात या सरावात सहभागी हाेऊ शकला नव्हता. त्याला चॅम्पियन्स लीगच्या दरम्यान दुखापत झाली हाेती.

    येत्या १४ जूनपासून रशियात विश्वचषकाला सुरुवात हाेत अाहे. टीमकडून सरस कामगिरी करण्याची त्याच्याकडून अाशा अाहे. पाेर्तुगाल-अल्जेरिया लढत : गुरुवारी पाेर्तुगाल व अल्जेरिया यांच्यात मैत्रीपूर्ण सामना रंगणार अाहे. राेनाल्डाे अाता संघात सहभागी झाला. यातूनच राेनाल्डाे अाता विश्वचषकाच्या तयारीसाठी अायाेजित सराव सामन्यात खेळणार अाहे. यात उल्लेखनीय कामगिरीचा राेनाल्डाेचा प्रयत्न असेल. त्यासाठी ताेदेखील सरावावर अधिक भर देत अाहे.

Trending