Home | Sports | Other Sports | Sania Mirza Slams Troller After Being Called Pakistani For Speaking On India Rape Case

रेप केसवर बोलली तर लोक म्हणाले पाकिस्तानी आहेस तू, सानियाने दिले असे उत्तर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2018, 10:33 AM IST

उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार तसेच जम्मू काश्मिरात झालेल्या 8 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या या दो

 • Sania Mirza Slams Troller After Being Called Pakistani For Speaking On India Rape Case

  स्पोर्ट्स डेस्क - उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार तसेच जम्मू काश्मिरात झालेल्या 8 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या या दोन प्रकरणांवरून देशभर संताप आहे. रस्त्यांवरून सोशल मीडिया पर्यंत सर्वत्र या घटनांचा निषेध केला जात आहे. याच मुद्यावर भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने सोशल मीडियावर रोष व्यक्त केला. पण, एका व्यक्तीने तिला पाकिस्तानी म्हणत तिला भारतातील मुद्द्यांवर बोलण्याचा काहीच हक्क नाही असे ट्रोल केले. यावर सानियाने दिलेल्या उत्तराचे कौतुक केले जात आहे.

  सानिया ने ट्वीट करत लिहिले, आपण साऱ्या जगाला दाखवू इच्छितो तसा हा खरंच दयावान देश आहे का? जर आजही आपण लिंग, जात, रंग, धर्म यांची परवा न करता 8 वर्षीय पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहू शकणार नाही तर आपण साऱ्या जगात पुन्हा कधीच उभे राहू शकणार नाही. मानवतेसाठी सुद्धा नाही. मला हा प्रकार किळसवाना वाटतो.

  एक म्हणाला, तू पाकिस्तानी आहेस
  सानियाच्या या पोस्टवर Kichu Kannan नावाच्या एका व्यक्तीने लिहिले, आदरणीय मॅडम, आपण कोणत्या देशाबद्दल बोलत आहात? मी आताच तुमच्याबद्दल चेक केले असता तुम्ही पाकिस्तानी आहात असे कळाले. आता तुम्ही भारतीय नाही. कारण, तुम्ही एका पाकिस्तानीशी विवाह केला आहे. आणि जर लिहायचेच असेल तर तेव्हा लिहा, जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी आमच्या लोकांना ठार मारतात.

  सानियाने दिले असे उत्तर
  सर्वप्रथम एक स्पष्ट करते की विवाह ठिकाणासोबत नाही, तर एका माणसासोबत केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे, तुमच्यासारख्यांनी मला सांगू नये की मी कोणत्या देशाकडून खेळते. मी भारती आहे. भारतासाठीच खेळते आणि यापुढे सुद्धा भारतासाठीच खेळत राहीन. तुम्ही सुद्धा धर्म आणि देशाचे वाद सोडून मानवतेसाठी समोर या.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, सानिया मिर्झाचे ते ट्वीट आणि झालेला वाद...

 • Sania Mirza Slams Troller After Being Called Pakistani For Speaking On India Rape Case
 • Sania Mirza Slams Troller After Being Called Pakistani For Speaking On India Rape Case
 • Sania Mirza Slams Troller After Being Called Pakistani For Speaking On India Rape Case

Trending