Home | Sports | Other Sports | Sindhu third place; Pranay's progress

सिंधू तिसऱ्या स्थानी; प्रणयची प्रगती;जागतिक बॅडमिंटन क्रमवारी जाहीर; सायनानेही राखून ठेवले स्थान

वृत्तसंस्था | Update - Jun 01, 2018, 06:47 AM IST

थाॅमस चषक बॅडमिंटन स्पर्धेतील उल्लेखनीय खेळीच्या अाधारे भारताच्या युवा खेळाडू एच. एस. प्रणयने जागतिक क्रमवारीत प्रगती स

 • Sindhu third place; Pranay's progress

  नवी दिल्ली - थाॅमस चषक बॅडमिंटन स्पर्धेतील उल्लेखनीय खेळीच्या अाधारे भारताच्या युवा खेळाडू एच. एस. प्रणयने जागतिक क्रमवारीत प्रगती साधली. त्याने अापल्या करिअरमधील सर्वाेत्तम स्थान गाठले. त्याने पुरुष एकेरीमध्ये अाठव्या स्थानावर धडक मारली.

  त्याचे अाता ५८,७६० गुण झाले अाहेत तसेच श्रीकांत हा चाैथ्या स्थानावर कायम अाहे. त्याने नुकत्याच झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यामुळे त्याला क्रमवारीमधील अापले स्थान कायम ठेवता अाले.
  दुसरीकडे रिअाे अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या क्रमवारीतील अापले तिसरे स्थान कायम ठेवले. तसेच माजी नंबर वन सायना नेहवालने अापले दहावे स्थान कायम ठेवले. महिला एकेरीच्या टाॅप-१० मध्ये काेणताही बदल झाला नाही.


  तसेच पुरुष एकेरीमध्ये बी. साईप्रणीतने अापले १८ वे स्थान कायम ठेवले. याशिवाय समीर वर्माने प्रगती साधली. त्याने २० व्या स्थानावर धडक मारली. त्याला एका स्थानाचा फायदा झाला. यातूनच त्याने क्रमवारीमध्ये अाघाडी घेतली अाहे.
  दुसरीकडे सात्त्विक राज अाणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीच्या क्रमवारीतील अापले १८ वे स्थान कायम ठेवले. मनु अत्री अाणि बी. सुमीत रेड्डीने २२ व्या स्थानावरचे अापले वर्चस्व कायम ठेवले.

Trending