Home | Sports | Other Sports | Special story on Harbhajan singh on his birthday

Harbhajan singh Birthday: क्रिकेट सोडून ट्रक ड्रायव्‍हर बनणार होता भज्‍जी, असा बनला स्‍टार Spinner

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jul 03, 2018, 08:44 PM IST

'द टर्बनेटर' म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या भज्‍जीचा म्‍हणजेच हरभजन सिंहचा आज 38वा वाढदिवस.

 • Special story on Harbhajan singh on his birthday
  'द टर्बनेटर' म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या भज्‍जीचा म्‍हणजेच हरभजन सिंहचा आज 38वा वाढदिवस. 3 जुलै, 1980साली पंजाबच्‍या जालंधर जिल्‍ह्यात हरभजन सिंहचा जन्‍म झाला. हरभजनला आज भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात दमदार गोलंदाजांपैकी एक म्‍हणून ओळखले जाते. आपल्‍या गोलंदाजीच्‍या बळावर त्‍याने भारताला अनेक सामने जिंकून दिले. सहजतेने हार न मानणारा खेळाडू म्‍हणूनही भज्‍जीला ओळखले जाते. आज वाढदिवसानिमित्‍त आम्‍ही हरभजन सिंहच्‍या अशा काही गोष्‍टी तुम्‍हाला सांगणार आहोत, ज्‍या फारच कमी जणांना माहिती आहे.


  हरभजनला बनायचे होते फलंदाज
  हरभजनने फलंदाज म्‍हणून आपल्‍या करिअरची सुरूवात केली होती. त्‍याचे पहिले कोच चरनजीत सिंह भुल्‍लर यांनीदेखील भज्‍जीला फलंदाजीचीच कोचिंग केली. मात्र कोचिंग सूरू झाल्‍यानंतर काही वेळातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यानंतर देविंदर अरोरा यांच्‍या मार्गदर्शनाखाली हरभजनसिंहने आपले प्रशिक्षण पुढे सूरू ठेवले. याचदरम्‍यान तो फलंदाजीकडून स्‍पीनींगकडे वळला. 1995-96 मध्‍ये पंजाबच्‍या रणजी ट्रॉफीमधून हरभजनने आपल्‍या करिअरला सुरूवात केली. आपल्‍या पहिल्‍याच सामन्‍यात हरियाणाविरोधात शानदार खेळी करताना हरभजनने 7/46 आणि 5/138 अशी चमकदार खेळी केली होती.

  क्रिकेटला राम राम ठोकून बनणार होता ट्रक ड्रायव्‍हर
  1998 मध्‍ये बंगळूरूमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या सामन्‍यात हरभजनला पहिल्‍यांदा भारतीय संघात स्‍थान मिळाले. मात्र या सामन्‍यात हरभजनला केवळ 2 विकेट्स घेता आले होते. तसेच हा सामनाही भारत हारला होता. त्‍यानंतर 1999-2000 च्‍या सीजनमध्‍येही हरभजनची कामगिरी सामान्‍यच राहिली. या कारणामुळे संघातही त्‍याला पक्‍के स्‍थान मिळू शकले नाही. याचदरम्‍यान मुरली कार्तिक, सुनील जोशी, सरनदीप सिंहसारखे स्पिनरही संघात स्‍थान मिळवण्‍यासाठी धडपडत होते. सततच्‍या अपयशामुळे हरभजन यावेळी क्रिकेट सोडण्‍याच्‍या विचारात होता. ऑस्‍ट्रेलियामध्‍ये जाऊन ट्रक ड्रायव्‍हर बनण्‍याचा विचारही त्‍याने केला होता. मात्र आई व बहिणींच्‍या पाठिंब्‍यामुळे हरभजनने पुन्‍हा क्रिकेटवर फोकस केले.


  2001मध्‍ये चमकला हरभजन
  2001मध्‍ये ऑस्‍ट्रेलियाने भारताचा दौरा केला होता. या दौ-यातच हरभजनने स्‍वत:ला सिद्ध केले. 3 टेस्‍ट सामन्‍यात हरभजनने 32 विकेट्स घेतल्‍या होत्‍या. यामध्‍ये एका हॅट्ट्रीकचाही समावेश आहे.


  2 वर्ल्‍ड कप विजेत्‍या टीमचा हिस्‍सा
  2007मध्‍ये आयसीसी टी20 वर्ल्‍ड कप आणि 2011मध्‍ये आयसीसी क्रिकेट वर्ल्‍ड कप विजेत्‍यास संघामध्‍ये हरभजनचा समावेश होता. भारताततर्फे 400 विकेट्स घेणारा हरभजन हा तिसरा फलंदाज आहे. आपल्‍या उत्‍कृष्‍ट खेळासाठी हरभजनला 2003मध्‍ये अर्जुन पुरस्‍कार तर 2009मध्‍ये पद्मश्री पुरस्‍काराने गौरविण्‍यता आले होते.

Trending