आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Federation Cup National Championship Of Kho Kho Continued To Dominate Maharashtra

महाराष्ट्राचे दाेन्ही संघ सलग पाचव्यांदा राष्ट्रीय चॅम्पियन; फेडरेशन चषक राष्ट्रीय खो - खो स्‍पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद-   महाराष्ट्राच्या युवांनी अापले वर्चस्व अबाधित ठेवताना  राष्ट्रीय खाे-खाे स्पर्धेत फेडरेशन चषक पटकावला. महाराष्ट्राचे पुरुष अाणि महिला संघ या स्पर्धेत पाचव्यांदा चॅम्पियन ठरले. पुण्याची युवा खेळाडू काजल भाेरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या महिला संघाने रविवारी अंतिम सामन्यामध्ये कर्नाटकवर मात केली. महाराष्ट्राच्या महिलांनी १५-६ अशा फरकाने सामना जिंकला. यासह महाराष्ट्राचा महिला संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. सपशेल अपयशी ठरलेल्या कर्नाटकच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना फार काळ मैदानावर महाराष्ट्राच्या अाव्हानाला प्रत्युत्तर देता अाले नाही. त्यामुळे टीमचे फेडरेशन चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. 


 महाराष्ट्राच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात काेल्हापूरवर मात केली. महाराष्ट्राने २२-१७ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. सुरेश सावंतच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने हे साेनेरी यश संपादन केले. यासह महाराष्ट्राने या स्पर्धेतील अापला दबदबा कायम ठेवला.   या सामन्यात प्रतीक वाईकरसह सुरेशने सुरेख खेळी केली. त्यामुळे पुरुष संघाला सामन्यात शेवटपर्यंत अापला दबदबा कायम ठेवता अाला. 

 

महेश, प्रतीकने पटकावला  पुरस्कार    
महाराष्ट्र पुरुष संघातील प्रतिभांवत युवा खेळाडू महेश शिंदे अाणि प्रतीक वाइकर स्पर्धेतील सर्वाेत्कृष्ट खेळाडू ठरलेे अाहेत. त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात अाला. यामध्ये महेशने सर्वाेत्कृष्ट  संरक्षक खेळाडूचा पुरस्कार पटकावला. तसेच प्रतीक वाईकर हा सर्वाेत्कृष्ट अष्टपैलू ठरला. त्याची स्पर्धेतील खेळी काैतुकास्पद ठरली. तसेच उपविजेत्या काेल्हापूर संघाच्या उमेश सातपुतेने सर्वाेत्कृष्ट अाक्रमक खेळाडूचा पुरस्कार संपादन केला. 

 

काजल, प्रियंका पुरस्काराच्या मानकरी   
महाराष्ट्र महिला संघाची कर्णधार काजल भाेर अाणि प्रियंका भाेपी यंंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकल्या. त्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वाेत्कृष्ट खेळाडूचे पुरस्कार पटकावले. कर्णधार काजल भाेरला स्पर्धेतील सर्वाेत्कृष्ट अाक्रमक खेळाडूचा पुरस्कार देऊन गाैरवण्यात अाले. तसेच प्रियंका भाेपी ही स्पर्धेत सर्वाेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. बक्षीस वितरण साेहळ्यामध्ये या दाेन्ही पुरस्कार विजेत्यांचा खास सत्कार करण्यात अाला. तसेच कर्नाटकच्या एम. वीणाने सर्वाेत्कृष्ट संरक्षक खेळाडू हाेण्याचा बहुमान मिळवला. तिची फायनलमधील खेळी महत्त्वाची ठरली. मात्र, तिला अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नही. 

बातम्या आणखी आहेत...