आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • There Is A Reduction In The Selection Of The Host Of The Host Of The Olympic

अाॅलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याच्या पसंतीमध्ये हाेत अाहे घट; 2014 मध्ये 11 देश उत्सुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगचेंग- अाॅलिम्पिकमधील सहभाग हा प्रत्येक खेळाडूचे अापले एक स्वप्न असते. त्यामुळेच त्या त्या देशाच्या यजमानपदाला प्रतिष्ठा मिळत असते. भारतासह अनेक देशांनी या स्पर्धेच्या यजमानपदासाठीची अापली दावेदारी केली अाहे. मात्र, मागील काही वर्षांपासून यामध्ये बदल हाेत अाहे. कारण या स्पर्धेच्या  अायाेजनाबाबतची अनुत्सुकता वाढत अाहे. त्यामुळे या स्पर्धेच्या यजमानपदासाठीच्या पसंतीमध्ये प्रचंड घट हाेत अाहे. २०२४ ते २०२८ मध्ये हाेणाऱ्या हिवाळी अाॅलिम्पिकच्या अायाेजनासाठी केवळ पाच देशांनी अापली दावेदारी सादर केली अाहे. 

 

६४५ काेटींच्या या स्टेडियमवर केवळ चार इव्हेंट

अाॅलिम्पिकच्या यजमानपदाबाबतच्या वादाला अाता प्याेंगचेंग येथील याच मैदानावरून सुरुवात झाली. या ठिकाणी ६४५ काेटी रुपये खर्च करून हे मैदान तयार करण्यात अाले. या स्टेडियमवर स्पर्धेतील केवळ चारच इव्हेंट हाेणार अाहे. त्यानंतर हे स्टेडियम नष्ट तयार करण्यात येईल. याच गाेष्टीला अनेकांनी माेठ्या प्रमाणात विराेध दर्शवला अाहे. त्यामुळे वादाला ताेंड फुटले. 

 

वाढत्या खर्चाच्या अाकडेवारीमुळे सध्या यजमानपदाची दावेदारीला नापसंती

- प्याेंगचेंग िहवाळी अाॅलिम्पिक अायाेजनाचे अंदाजे बजेट ४५ हजार काेटी अाहे. यात खर्च केवळ ८४ काेटी रुपये हाेतील.
- प्याेंगचेंगच नव्हे, तर मागील ५० वर्षातील अाॅलिम्पिक स्पर्धेच्या अायाेजनावर माेठ्या प्रमाणात खर्च. यजमानांवरील कर्जाच्या बाेजामध्ये झाली माेठी वाढ.
-१९९० पूर्वी अायअाेसीचा ५ टक्के हाेता कमाईचा वाटा. मात्र, अाता रिअाे अाॅलिम्पिकपासून यात झाली वाढ. ७ टक्के वाट द्यावा लागत असल्याने यजमानांवर अार्थिक संकटाचे सावट निर्माण झाले अाहे.  
- रिअाे अाॅलिम्पिकनंतर बांधून ठेवलेल्या स्टेडियममध्ये  अार्थिक गैरव्यवहाराची चर्चा. त्यामुळे बजेटवर जगभरातून टीका झाली.

 

२०३२  अाॅलिम्पिक; भारत प्रबळ दावेदार
भारत, जर्मनी अाणि अाॅस्ट्रेलिया संघ २०३२ च्या अाॅलिम्पिक स्पर्धा अायाेजनासाठी उत्सुक अाहेत. यासाठी सरकारची परवानगी मिळाल्यास अाम्ही दावेदारी सादर करू, असे भारतीय महासंघाचे अध्यक्ष रामचंद्रन म्हणाले. 

 

रिअाे अद्यापही अार्थिक अडचणीत कायम 
२००९ मध्ये अायाेजित रिअाे अाॅलिम्पिक  स्पर्धेचा अदांजे खर्च २९ हजार काेटी हाेता. मात्र, ८४ हजार काेटींचा खर्च झाला. याच अार्थिक अडचणींमुळे स्टेडियमचे बांधकाम अडचणीत सापडले.अद्यापही याच अडचणीमध्ये रिअाे कायम असल्याचे चित्र अाहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाही, २००४ अाॅलिम्पिकनंतर यजमान व दावेदार... 

बातम्या आणखी आहेत...