Home | Sports | Other Sports | Welcome to Everestee Manisha IN AURANGABAD

AURANGABAD: एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारेचे अाैरंगाबादमध्ये जल्लाेषात स्वागत

क्रीडा प्रतिनिधी | Update - Jun 02, 2018, 07:21 AM IST

जगातील सर्वात उंच सर्वाेच्च माउंट एव्हरेस्ट सर करण्याची माेहीम फत्ते करणाऱ्या अांतरराष्ट्रीय गिर्याराेहक मनीषा वाघमारेचे

  • Welcome to Everestee Manisha IN AURANGABAD

    अाैरंंगाबाद - जगातील सर्वात उंच सर्वाेच्च माउंट एव्हरेस्ट सर करण्याची माेहीम फत्ते करणाऱ्या अांतरराष्ट्रीय गिर्याराेहक मनीषा वाघमारेचे शुक्रवारी अाैरंगाबादमध्ये अागमन झाले. या वेळी तिचे विमानतळावर माेठ्या जल्लाेषात स्वागत करण्यात अाले. कुटुंबीयांनी औक्षण करून तिचे स्वागत केले. त्यानंतर विमानतळावरून माेठ्या उत्साहात तिची मिरवणूक काढण्यात अाली. दरम्यान, या ठिकाणी चाहत्यांनी माेठ्या संख्येने उपस्थिती लावली.

    विमानतळावरून निघालेल्या मिरवणुकीचा समाराेप अाैरंगपुऱ्यातील स.भु. महाविद्यालयात झाला. याप्रसंगी तिचा सत्कार करण्यात अाला. तिने २१ मे राेजी सर्वाेच्च माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला.

  • Welcome to Everestee Manisha IN AURANGABAD
    विमानतळावर चाहत्यांची गर्दी; मिरवणुकीसह जंगी स्वागत केले. छाया:रवी खंडाळकर

Trending