आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंबर वनचे स्थान गाठणार! सिंधूचा दावा; राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदकाचा ललिता बाबरला विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अविस्मरणीय कामगिरीने यंंदाचे वर्ष गाजवण्यासाठी मी प्रयत्नशील अाहे. यामध्ये नंबर वनचे सिंहासन गाठण्याचे माझे एकमेव लक्ष्य अाहे. हे गाठण्यासाठी  मी कसून मेहनत घेत अाहे. त्यामुळे निश्चितच मी हे अव्वल स्थान गाठेन,’ असा दावा रिअाे अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने व्यक्त केला. ती मंगळवारी मुंबई येथील एका कार्यक्रमात सहभागी झाली हाेती. तिने भविष्यातील याेजनांविषयीची माहिती दिली. या साेहळ्यामध्ये सिंधूसह  श्रीकांत, अाॅलिम्पियन ललिता बाबर व कुस्तीपटू साक्षी मलिकही सहभागी हाेते.  


राष्ट्रकुल, एशियन गेम्स गाजवणार
ललिता  अाॅस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धा अाणि त्यानंतर हाेणाऱ्या एशियन गेम्समध्ये साेनेरी यश संपादन करण्यासाठी मी उत्सुक अाहे. या दाेन्ही स्पर्धा गाजवणार असल्याचा निर्धार शिवछत्रपती पुरस्कार विजेती धावपटू ललिता बाबरचा अाहे.

बातम्या आणखी आहेत...