आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Woman Wrestlers Open Challenge To Male Wrestlers, Combat, Loss And Alleged Cheating

अखाड्यात येऊन तिने दिले पुरुषांना खुले आव्हान, चित होताच लावले हे आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - मुरैना येथील अखाड्यात पैलवानांची दंगल सुरू होती. त्याचवेळी एक महिला कुस्तीपटू अखाड्यात उतरली आणि तेथे उपस्थित सगळ्याच पैलवानांना खुले आव्हान दिले. यानंतर एक पुरुष पैलवान तिच्या विरोधात उतरला. दोघांचाही सामना बरोबरीवर संपला. यानंतर दुसऱ्या एका पैलवानाने महिला पैलवानाला चारी मुंड्या चित केले. पराभवानंतर निराश झालेल्या महिलेने पुरुष पैलवानावर खोडी केल्याचा आरोप लावला. मात्र, रेफरीने तिचे काहीच न ऐकता पराभूत घोषित केले. 

 

अशी झाली कुस्ती...
- कुस्तीचे आयोजन मध्य प्रदेशच्या मुरैना येथे झाले होते. मैदानात आयोजित या लढतीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक शहरातील कुस्तीपटू एकवटले होते. यातील प्रमुख कुस्ती दिल्लीचा पैलवान वरुण आणि हाथरसच्या हरिकेश यांच्यात झाली. 
- याच कुस्तीदरम्यान आग्रातील महिला पैलवान भारतीने पुरुषांना खुले चॅलेंज केले. यावर जिंगनीचा रोहित आखाड्यात उतरला आणि दोघांमध्ये लढत झाली.
- भारतीने रोहितला चकवे आणि विविध प्रकारचे डावपेच रचून रोहितला हैराण केले. मात्र, दोघेही एकमेकांना पराभूत करू शकले नाही. 


हिने लावला आरोप...
- यानंतर जबलपूरची शिवानी सुद्धा मैदानात उतरली. तिने आव्हान दिले. पण, गजेन्द्रने शिवानीचे आव्हान स्वीकारत तिला सपशेल पराभूत केले. 
- शिवानीने आपले पराभव स्वीकारण्यास नकार दिला. तसेच गजेंद्रने फाऊल केल्याचा आरोप लावला. कुस्ती पुन्हा व्हायला हवी असा हट्ट तिने धरला. पण, रेफरीने काहीच ऐकण्यास नकार देत गजेंद्रला विजयी घोषित केले. 
- ही कुस्ती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. शेवटच्या सामन्यात दिल्लीचा पैलवान वरुण विजेता ठरला. त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, महिला पैलवानाला असे केले चित, लावला आरोप...

बातम्या आणखी आहेत...