Home | Sports | Other Sports | WWE Star John Cena And GF Nikki Bella Split Right Before 2 Weeks From Marriage

जॉन सीनाचे लग्नाच्या अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी ब्रेकअप, रिंगमध्ये केले होते प्रपोज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2018, 11:44 AM IST

वर्ल्ड रेसलिंगच्या लाइव्ह मॅचमध्ये महिला रेसलरला प्रपोज करून एंगेजमेंट करणारा स्टार रेसलर जॉन सीना याचे ब्रेक-अप झाले

 • WWE Star John Cena And GF Nikki Bella Split Right Before 2 Weeks From Marriage

  स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड रेसलिंगच्या लाइव्ह मॅचमध्ये महिला रेसलरला प्रपोज करून एंगेजमेंट करणारा स्टार रेसलर जॉन सीना याचे ब्रेक-अप झाले आहे. विशेष म्हणजे, 5 मे रोजी या दोघांचा विवाह निश्चित होता. पण, लग्नाच्या अवघ्या 2 आठवड्यांपूर्वीच ते एकमेकांपासून दूर झाले आहेत. गतवर्षी एप्रिलमध्ये निकी बेला हिला प्रपोज करून एंगेजमेंट केल्याच्या एका वर्षानंतर अर्थात 14 एप्रिलला त्याने प्रेम आणि माफीचे ट्वीट केले. यानंतर एका अमेरिकन माध्यमाशी संवाद साधताना संबंध मोडल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला.

  काय म्हणाला जॉन सीना
  - प्रेम खंरच खूप सुंदर आहे. पण, ते निभावणे सोपे आहे असे समजण्याची चूक कुणीच करू नये. याची प्रचिती आम्हाला 6 वर्षे सोबत येऊन आली असे एका माध्यमाशी संवाद साधताना जॉन सीना म्हणाला.
  - गेल्या 6 वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेट करत होतो. गतवर्षी एंगेजमेंट केली आणि 5 मे रोजी विवाह देखील करणार होतो. पण, आम्ही ब्रेक-अप करण्याचा निर्णय घेतला आहे.
  - प्रत्येक कपलचे काही प्रॉब्लेम असतात. असेच काही प्रॉब्लेम आमच्या नात्यात देखील होते. काही खासगी होते, तर काही जाहीररीत्या समोर आले. गेली 5 वर्षे आम्ही एमकेकांना समजून घेत आलो आहोत.
  - एकमेकांचे वर्किंग शेड्युल वेगळे असल्याने वेळ देता आली नाही. कित्येक महिने आम्ही कामाच्या व्यस्ततेमुळे एकटेच राहत होतो. असेही जॉनने सांगितले.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो...

Trending