आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • WWE Superstar Paige Suffering Back Injury From Sasha Banks Kick, May Not Return To The Ring

WWE च्या या फीमेल रेसलरला गंभीर दुखापत, रिंगमध्ये परतणे कठिण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - WWE ची सुपरस्टार ब्रिटिश फीमेल रेसलर सराया जेड बेविस उर्फ 'पेज' हिचे रिंगमध्ये परतणे आता कठिण झाले आहे. एका फाइटमध्ये लागलेल्या जबरदस्त किकमुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, ते दुरुस्त होण्यासाठी खूप दिवस लागतील. त्यामुळे, तज्ञांनी तिला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. ही किक दुसरी स्टार फीमेल रेसलर साशा बँकने मारली होती. यानंतर मॅच थांबवावी लागली. 

 

- लाँग आयलंड येथे झालेल्या फीमेल रेसलिंग मॅच दरम्यान पेजला काहीच कल्पना नसताना बँकने अचानक मागून जबरदस्त किक मारली. 
- सुरुवातीला लोकांना ही नॉर्मल किक वाटली. पण, तिची मान आणि डोक्याच्या मध्यभागी लागलेली ही किक इतकी जबरदस्त होती की पेज जागेवरच कोसळली. 
- तिची अवस्था पाहता रेफरीने वेळीच मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. तिला झालेली दुखापत अतिशय गंभीर असल्याने ती आता रिंगमध्ये परतणार नाही असे सांगितले जात आहे.
- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तिची जखम बरी होण्यासाठी खूप दिवस लागतील. त्यामुळे, तिला WWE चा दिग्गज रेसलर Edge प्रमाणे रिटायरमेंट घ्यावी लागेल. 
- विशेष म्हणजे, या दुखापतीनंतर तिने 28 जानेवारी रोजी होणाऱ्या रॉयल रम्बलमधून आपले नाव परत घेतले आहे. 16 महिने डिप्रेस राहिल्यानंतर तिने RAW मध्ये कमबॅक केले होते. आता तिच्या रिटायरमेंटच्या चर्चा आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पुन्हा दिसणार नाही या डीव्हाचा जलवा...

बातम्या आणखी आहेत...